कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha : गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार

Chetan Narke Withdrawal From Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून इच्छुक असलेले आणि अपक्ष फॉर्म भरलेले गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी माघार

कोल्हापूर :- गोकुळचे संचालक चेतन नरके Chetan Narke यांनी लोकसभा निवडणुकीतून Kolhapur Lok Sabha माघार घेतल्याचे जाहीर केले. निवडणुकीत माघारीचा निर्णय जाहीर करताना चेतन नरके Chetan Narke भावूक झाले हाेते. दरम्यान मी अद्याप कोणाला ही पाठींबा दिलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. Kolhapur Lok Sabha Update

गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतल्याचे सांगितलं. Kolhapur Lok Sabha Update

चेतन नरके हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक हाेते. मात्र महाविकास आघडीने शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चेतन नरके यांनी अपक्ष लढावे असे त्यांच्या समर्थकांची इच्छा हाेती पण आयत्या वेळी चेतन नरके यांनी माघार घेतली.नरके म्हणाले मी राजकीय जोडण्या करण्यात कमी पडलो. मी अद्याप कोणाला ही पाठींबा दिलेला नाही. आगामी काळात जनतेची जितकी सेवा करता येईल तितकी करेन असेही त्यांनी नमूद केले. Kolhapur Lok Sabha Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0