मुख्य सामग्री पर जाएँ

Ketan Agarwal Murder : गुगल सर्च हिस्ट्री पाहून पोलीसही थक्क

Ketan Agarwal Murder : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या लोहगड किल्ल्यावरून झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

Ketan Agarwal Murder

Ketan Agarwal Murder : आरोपी सिया गोयलने आधीच केले होते 'हे' प्रश्न सर्च

Ketan Agarwal Murder : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या लोहगड किल्ल्यावरून झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणारा हा प्रकार म्हणजे एक अत्यंत नियोजनबद्ध हत्याकांड असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी सिया गोयलचा दुसरा मोबाईल फोन जप्त केला असून, तिची गुगल सर्च हिस्ट्री समोर आल्यानंतर पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. ( ketan agarwal murder siya google history)

हत्याकांडाआधी गुगलवर शोधले 'हे' प्रश्न
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल यांची हत्या करण्यापूर्वी सिया गोयलने तिच्या मोबाईलवरून गुगलवर अनेक संवेदनशील विषयांवर शोध घेतला होता. त्यात प्रामुख्याने मेघालय येथे घडलेल्या बहुचर्चित राजा रघुवंशी हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम आणि पोलिसांनी केलेला तपास तिने सविस्तर वाचला होता.

Khadakwasla Dam Overflow: खडकवासला ओव्हरफ्लो! मुठा नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा वेढा

पोलीस कस्टडीमध्ये महिलांना मारहाण केली जाते का आणि तेथील नियम काय असतात, याबद्दल तिने माहिती घेतली होती. डोंगरावरून किंवा कड्यावरून खाली पडल्यास मृत्यू अपघाती मानला जातो की नाही. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यास जामीन मिळण्याची प्रक्रिया आणि कायदेशीर अडचणी कशा असतात. Ketan Agarwal Murder

पोलिसांकडून दुसरा मोबाईल जप्त
तपास पथकाने आरोपी सिया गोयल हिच्या राहत्या घरातून तिचा दुसरा लपवून ठेवलेला मोबाईल हस्तगत केला. या फोनच्या फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान ही सर्च हिस्ट्री उघडकीस आली. यावरून हत्येचा हा कट अचानक घडलेला नसून आधीपासूनच थंड डोक्याने रचला गेला असल्याचे स्पष्ट होत आहे. Ketan Agarwal Murder

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यासाठी पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल

काय आहे प्रकरण?
१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले असताना ४०० फूट खोल दरीत कोसळून केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. फोटो काढताना पाय घसरून केतन पडल्याचा बनाव सियाने रचला होता. मात्र, तांत्रिक पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे पोलिसांनी सिया गोयल व चेतन चौधरी यांना अटक करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठवले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Ketan Agarwal Murder

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें