Vertillas: खराडीच्या ‘व्हर्टिलाज’ प्रकल्पाच्या विकासकांविरुद्ध रिकव्हरी वॉरंट जारी
Vertillas : खराडी येथील बहुचर्चित ‘व्हर्टिलाज’ (Vertillas) गृहप्रकल्पातील फ्लॅटधारकांना वेळेत ताबा न देणे आणि कराराप्रमाणे देय व्याजाची र क्कम न चुकवणे विकासकांना चांगलेच महागात पडले आहे.
1 મિનિટ વાંચન

Vertillas : महारेराचा दणका: फ्लॅटचा ताबा आणि व्याजाचे पैसे न दिल्याने कारवाई
Vertillas : खराडी येथील बहुचर्चित ‘व्हर्टिलाज’ (Vertillas) गृहप्रकल्पातील फ्लॅटधारकांना वेळेत ताबा न देणे आणि कराराप्रमाणे देय व्याजाची र क्कम न चुकवणे विकासकांना चांगलेच महागात पडले आहे. महाराष्ट्र रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (महारेरा) या प्रकरणात कडक भूमिका घेत संबंधित विकासकांविरुद्ध रिकव्हरी वॉरंट जारी केले आहेत. १० जुलै २०२६ रोजी महारेराचे न्यायनिवाडा अधिकारी ए. एन. सिरसीकर यांनी हे आदेश दिले असून, बांधकाम व्यावसायिकांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे. Vertillas maharera recovery warrant

महारेराने ‘मेसर्स अमी इस्टेट्स एलएलपी’ आणि ‘मेसर्स ए. पी. भंडारी’ या विकासक संस्थांविरुद्ध हे वॉरंट जारी केले आहे. यासोबतच संबंधित संस्थांमधील भागीदार असलेले राजेन नेमीचंद रायसोनी, सिद्धार्थ संजय कोठारी, अरमान उर्फ अमान सुनील कोठारी, अशोक फूलचंद भंडारी, साधना अशोक भंडारी आणि अक्षय अशोक भंडारी यांनाही या कारवाईचा फटका बसला आहे. Vertillas

Water Crisis : नागरिकांच्या कराचे १६०० कोटी रुपये गेले ‘पाण्यात’
तक्रारदार गृहखरेदीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी महारेराने जिल्हाधिकाऱ्यांना थेट निर्देश दिले आहेत. महारेराच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने संबंधित विकासकांकडून जमिनीच्या महसुलाच्या थकबाकीप्रमाणे (Land Revenue Arrears) रक्कम वसूल करावी. ही वसुली करून ती तक्रारदारांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी आणि त्याचा सविस्तर अहवाल प्राधिकरणाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश न्यायनिवाडा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

PMC News : महापालिकेचे १० लाखांचे ‘फूड टेस्टिंग मशिन’ गायब; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
महारेराच्या या निर्णयामुळे आपली हक्काची घरे मिळण्यासाठी आणि व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महारेराची ही कठोर भूमिका रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासकांसाठी एक इशारा मानली जात आहे. Vertillas
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
