मुंबई

Ghatkopar hoarding collapse: घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यू पडलेलाच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर

Ghatkopar hoarding collapse : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे

मुंबई :- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत Ghatkopar hoarding collapse 8 जणांचा मृत्यू 8 people Died झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई आणि परिसरात अचानक आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे घाटकोपरच्या छेडा नगर Cheda Nagar येथील महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर Petrol Pump कोसळलं होतं. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने अनेक वाहने होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकली.

पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. CM Eknath Shinde Reaction On Ghatkopar hoarding collapse

मिळालेल्या माहितीनुसार, होर्डिंग कोसळलं त्यावेळी पेट्रोल पंपावर अनेक वाहने होती. जवळपास 100 जण या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. आतापर्यंत 54 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना जवळील राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. CM Eknath Shinde Reaction On Ghatkopar hoarding collapse

या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 57 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख देण्याचे जाहीर केले असून जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील. तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. CM Eknath Shinde Reaction On Ghatkopar hoarding collapse

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0