ATS Raid: महाराष्ट्र ATS ची राज्यभर मोठी कारवाई
मुंबई, महाराष्ट्र मिरर
3 min read

ATS Raid: पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कविरोधात २०० हून अधिक ठिकाणी छापे
मुंबई, महाराष्ट्र मिरर
ATS Raid: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी राज्यभर मोठी कारवाई हाती घेतली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI समर्थित आणि आर्थिक मदत मिळणाऱ्या पाकिस्तानस्थित गुन्हेगारी-दहशतवादी नेटवर्कविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. ( ats raid pakistan terrorist network )
Irani Cafe : ‘ईराणी‘ कॅफेत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ!
एटीएसच्या माहितीनुसार, हे नेटवर्क भारतातील युवकांचे कट्टरतावादीकरण (Radicalisation), भरती (Recruitment) आणि दहशतवादी कारवायांना सहाय्य करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचा संशय आहे. ( ATS Raid )

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?
या नेटवर्कचा संबंध पाकिस्तानस्थित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित शहजाद भट्टी, अमजल गुजर, आबित जाट, राणा हुसेन, अब्दुल मेमन, मुन्ना झिंगाडा, फारूक खोखर, झफर सुपारी, शानी टायगर, शेख सलमान, सरफराज डोंगर उर्फ जोरासिंग, अबू मुसा आणि सरकार यांच्याशी असल्याचे एटीएसने म्हटले आहे. हे आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील असुरक्षित आणि दिशाभूल होऊ शकणाऱ्या युवकांना लक्ष्य करत असल्याचा संशय आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
कोण आहे शहजाद भट्टी?
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहणारा शहजाद भट्टी हा मागील काही महिन्यांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. 45 वर्षीय भट्टी याच्या विरोधात भारतातील दहशतवादी नेटवर्क वाढवणे, हेरगिरीशी संबंधित डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. भट्टी हा सध्या दुबईतून नेटवर्क चालवत आहे. तो पाकिस्तान आणि आशियातील काही देशांत वारंवर प्रवास करत असतो. त्याने मार्च 2024 मध्ये जालंधरमध्ये युट्युबर रॉजर संधूच्या घरावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्याच्यावर बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार झीशान अख्तरला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप आहे. ( ATS Raid )
PCMC News : ₹400-Crore Corporation School Supplies Procurement Scam Hits
या कारवाईअंतर्गत महाराष्ट्रभरातील २०० हून अधिक संशयित व्यक्तींवर एकाचवेळी छापे टाकण्यात येत आहेत. संशयास्पद संपर्कांची सत्यता पडताळणे, त्यांचे नेटवर्क उघड करणे आणि त्यांचा देशविरोधी किंवा दहशतवादी कारवायांसाठी गैरवापर होऊ नये, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. ( ATS Raid )
पाकिस्तानस्थित भट्टीच्या युजर आयडीशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी एटीएसच्या संभाजीनगर युनिटने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत धाडसत्र राबवलंय. या कारवाईत छत्रपती संभाजीनगरमधून 9, जालन्यातून 2, बीडमधून 1 आणि धाराशिवमधून 1 अशा एकूण 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांना पुढील चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील एटीएस कार्यालयात आणण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असून, तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर एटीएसची धडाकेबाज कारवाई
पाकिस्तानी गँगस्टर 'शहजाद भट्टी' याच्या सोशल मीडिया युझर आयडीशी संपर्क साधल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) जालना जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अंबड आणि भोकरदन तालुक्यातून प्रत्येकी एका संशयिताला एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Crime News : पुण्यात ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; सराईत आरोपी अटकेत

मोबाईल आणि सीडीआरची सखोल तपासणी
पाकिस्तानी गँगस्टरसोबत या तरुणांचे काही आर्थिक व्यवहार किंवा संभाषण झाले आहे का, हे तपासण्यासाठी एटीएसने या सर्व १४ जणांचे मोबाईल फोन, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी सुरु केली आहे. या कारवाईनंतर एटीएस कार्यालयाच्या बाहेर संशयितांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यापूर्वी मे महिन्यातही एटीएसने १३ संशयितांची चौकशी केली होती. मात्र, त्यावेळी तांत्रिक तपासात संशयास्पद असे काहीही निष्पन्न न झाल्याने चौकशीअंती त्यांना सोडून देण्यात आले होते.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


