मुंबई
Trending

Election Commission Raid : “निवडणूक आयोगाची कारवाई ; घाटकोपर मध्ये 72 लाखाची रोकड जप्त

Election Commission Raid In Ghatkopar : घाटकोपरच्या नील युवक मॉल जवळ लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने केली कारवाई

मुंबई :- निवडणूक आयोगाच्या भरारी Election Commission Raid पथकाने मुंबईच्या उपनगरात मोठी कारवाई करत लाखोंची रोकड जप्त केले आहे.घाटकोपर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे.घाटकोपरच्या निलयोग मॉल Neelyog Mall जवळ लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 72 लाख रुपयांची ही रोख रक्कम होती. Election Commission Raid In Ghatkopar

दीपक निषाद आणि अतुल निषाद हे दोन भाऊ त्यांच्या गाडीतून ही रक्कम घेऊन जात होते. दीपक निषाद हा पेशाने सीए असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या Election Commission Member अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान गाडीत ही रक्कम आढळली. निवडणुकीच्या काळात हे पैसे वापरले जाणार होते, अशी टीप निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. शनिवारी (16 मार्च) रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करत तारखांची घोषणा केली. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये हे पैसे सापडल्याचे वृत्त येताच एकच खळबळ माजली. त्यानंतर आचारसंहितेच्या काळातील मुंबईतील ही पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. Election Commission Raid In Ghatkopar

उपजिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे, तहसिलदार वृशाली पाटील व प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मोटरगाडीतील दोघांचीही चौकशी करण्यात आली. त्यांना अधिक चौकशीसाठी पंतनगर पोलीस ठाण्यात Pant Nagar Police Station नेण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत ही रक्कम निवडणुकीशी संबंधित नसल्याचे दिसून आहे. मात्र या रोख रकमेबाबत तपासणी सुरू असून ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. Election Commission Raid In Ghatkopar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0