मुंबई

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मित्र पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे

Sanjay Raut On Lok Sabha Election : संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि धामण ठाकरे यांच्यावर केलेली टीका

मुंबई :- लोकसभा निवडणुका Lok Sabha Election आता तोंडावर आल्या असून आदर्श आचारसंहिता लागली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. या संदर्भात खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, आगामी दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. आमच्या जागा वाटपाचा निर्णय झालेला नसला तरी देखील आमच्या प्रचारावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.आमचा प्रचार जोरात सुरू असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीला दिलेला प्रस्ताव हा अंतिम नसून या प्रस्तावावर आणखी चर्चा होऊ शकते, असे मत देखील खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी व्यक्त केले आहे. याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील महाविकास आघाडी सोबत यावे, अशी आमची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. एका मतदारसंघातून एकापेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे त्याचा अर्थ वाद होत नाही. राज्यातील शिवसेना लढत असलेल्या जवळपास सर्वच मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत. मात्र पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचे सर्वांनी मान्य केले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे सध्या असलेला पद हे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाटेला आलेले सर्वोच्च पद असल्याचे देखील खासदार राऊत म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे Raj Thackeray आणि अमित शहा Amit Shah यांची दिल्लीत झालेल्या भेटीवर देखील त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे एक व्यंगचित्र काही दिवसांपूर्वी काढले होते. त्या व्यंगचित्रात त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली होती. या व्यंगचित्राबाबत राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली असेल, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि शहा यांचे भेटीवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटल्यानंतर शिवसेनेच्या वतीने राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर देत मनसेने देखील संजय राऊत यांचे काही जुने व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0