मुंबईमहाराष्ट्र

Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह

Mahad Chavdar Tale Satyagraha : भारतीय जातीय व्यवस्थेच्या अस्पृश्यता मोडीस काढण्याचा बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar यांनी केलेला उठाव

मुंबई :- भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती.ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल. Mahad Chavdar Tale Satyagraha महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी 1924 साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.

चवदार तळे Mahad Chavdar Tale Satyagraha हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.

महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख ही त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते. 1927 साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.आंबेडकरांनी Dr Babasaheb Ambedkar सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले. त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे 5000 जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.

महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी 40 रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.

चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, “तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे.” धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले. त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले.ह्या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करून चुक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले. Mahad Chavdar Tale Satyagraha

विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते.

नंतर 19 मार्च 1940 रोजी डॉ. आंबेडकर यांनी महाडमधे 14वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केेेला. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड. विष्णू नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करून आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी 1931 पासुन डॉ. आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता. Mahad Chavdar Tale Satyagraha

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0