मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

CRIME NEWS : दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक

७ हजार रुपये किमतीची ७० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

CRIME NEWS : दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक

७ हजार रुपये किमतीची ७० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त

पिंपरी, CRIME NEWS: मोकळ्या जागेत कारमधून बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करत असताना पोलिसांनी कारवाई करून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (२९ जून) सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास सुदुंबरे-तळेगाव दाभाडे रोडवर करण्यात आली.CRIME NEWS

याबाबत दारूबंदी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत पतंगे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज दुलकसिंग राजपूत (२३, रा. ता. खेड) याला अटक करण्यात आली असून, दारू पुरवणारा मुख्य आरोपी प्रदीप गुड्दावन (रा. यवत) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज दुलकसिंग राजपूत हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्रे रंगाच्या वॅगनार कारमधून (एम.एच. १४ सी.एस. ६६५६) ७ हजार रुपये किमतीची ७० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू बेकायदेशीररित्या वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आला. तपासात ही हातभट्टीची दारू त्याला आरोपी प्रदीप गुड्दावन याने पुरविल्याचे समोर आले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

CRIME NEWS

शेअर करा