महाराष्ट्र

सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही ; विशाल पाटील

Congress Leader Vishal Patil Post Sangali LokSabha Election 2024 : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

मुंबई :- लोकसभेच्या सांगली लोकसभेच्या Sangali LokSabha Election 2024 जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंच्या सेनेकडून सांगली जागा करीत चंद्रहार पाटील Vishal Patil यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेस Congress आणि शिवसेना UBT Shivsena यांच्यात सांगलीच्या जागेवर मतभेद झाले. त्यानंतर सांगलीच्या काँग्रेस कमिटीने दिल्लीत जाऊन वरिष्ठांचे भेट घेतली तसेच संजय राऊत Sanjay Raut यांनी काही दिवसांपासून सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होत होते त्यानंतर विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा एक केवळ आपलीच असल्याचे सांगितले. कॉंग्रेस देते विशाल पाटील कार्यकर्त्यांना आवाहन केले की सांगलीची जागा सोडायची नाही.

विशाल पाटील यांचे पत्र

मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे. Congress Leader Vishal Patil On Sangali LokSabha Election

स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत. Congress Leader Vishal Patil On Sangali LokSabha Election

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0