मुंबई

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत ‌न्याय जोडो यात्रा सांगता,मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर

Rahul Gandhi In Mumbai : पोलीस उप आयुक्त वाहतूक यांनी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचे दिले निर्देश

मुंबई :- रविवार (17 मार्च ) रोजी शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे ” भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा” आयोजित करण्यात आलेली आहे. सभेच्या निमित्त शिवाजी पार्क येथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून नागरीक हे वाहनाने मोठया प्रमाणात हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची, तसेच सभेच्या स्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.‌समाधान पवार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग), वाहतूक, यांनी वाहतूक व्यवस्थापना मध्ये बदल करण्यात निर्देश दिले आहे.हे निर्देश रविवारी (17 मार्च ) सकाळी 09 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लागु करण्यात आले आहे. Rahul Gandhi In Mumbai

वाहने उभीकरण्यास प्रतिबंध असलेले रस्ते

1.स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, श्री. सिध्दिविनायक मंदीर जंक्शन ते हरी ओम जंक्शन.

2.केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), शिवाजीपार्क, दादर (प.), मुंबई.

3.एम. बी. राऊत मार्ग, शिवाजीपार्क, दादर (प.), मुंबई.

4.पांडुरंग नाईक मार्ग, (शिवाजीपार्क रोड नं. ५), शिवाजीपार्क, दादर (प.), मुंबई.

5.गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड) दादर.

6.दिलीप एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते मीनाताई ठाकरे पुतळा), दादर

7.एल. जे. रोड, गडकरी जंक्शन ते शोभा होटेल जंक्शन

8.सेनापती बापट मार्ग एलफिन्स्टन जंक्शन ते माहिम फाटक जंक्शन,

9.मनमाला टैंक रोड, स्टार सिटी सिनेमा जंक्शन ते गंगाविहार जंक्शन

10.मनोरमा नगरकर मार्ग, राजाबढे जंक्शन ते स्टार सिनेमा जंक्शन

11.टी. एच. कटारीया मार्ग, गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन.

वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग

1.स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (सिद्धीविनायक मंदीर जंक्शन ते येस बैंक जंक्शन)

पर्यायी मार्ग :- सिध्दिविनायक मंदिर जंक्शन-उजवे वळण-एस. के. बोले रोड-आगार बाझार-पोतुर्गीज चर्च- गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.

2.राजाबडे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शन येथ पर्यंत.

पर्यायी मार्ग :- एल. जे. रोड-गोखले रोड स्टिलमॅन जंक्शन-पुढे गोखले रोड चा वापर करतील.

3.दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग.

पर्यायी मार्ग :- राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.

4.गडकरी चौक येथुन केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.

पर्यायी मार्ग: एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा,

आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणारे मार्ग

1.बाळगोविंद दास मार्ग, प‌द्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोड पासुन पश्चिम दिशेला एल. जे. मार्गापर्यंत.

पर्यायी मार्ग:- मनोरमा नगरकर मार्गाचा वापर करतील.

2.दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथुन गडकरी जंक्शनपर्यंत.

पर्यायी मार्ग: एल. जे. रोड, गोखले रोड, रानडे रोडचा वापर करतील.

वाहनांची पार्किंग व्यवस्था

1.सेनापती बापट मार्ग, माहिम फाटक जंक्शन ते दादर पश्चिम रेल्वे स्थानक, मुंबई.

2.इंडीया बुल फायनान्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई.

3.कोहिनुर स्क्वेअर, कोहिनुर मिल कंम्पाऊंड, दादर (पश्चिम) मुंबई.

4.आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई.

5.माहिम रेती बंदर, माहिम पं., मुंबई.

6.आर. ए. के. ४ रोड, माटुंगा (पुर्व), मुंबई.

7.पाच उद्यान, माटुंगा (पुर्व), मुंबई.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0