मुंबई

Coastal Road : कोस्टल रोड सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहणार

Mumbai Police Gives Coastal Road Timing Update : अपर पोलीस आयुक्त, वाहतूक एम.रामकुमार यांनी कोस्टल रोड संदर्भात सूचना दिल्या आहेत.

मुंबई :- बहुचर्चित राहिलेला कोस्टल रोड Coastal Road म्हणजेच धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग आता सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असल्याच्या सूचना अपर पोलीस आयुक्त वाहतूक एम रामकुमार यांनी दिल्या आहे.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग (कोस्टल रोड) हा वेगवान रहदारीसाठी बांधण्यात आलेला मार्ग 12 मार्च रोजीपासून खान अब्दुल गफार खान मार्गाच्या बिंदु माधव जंक्शन ते मरिन ड्राईव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) पर्यंत दक्षिण वाहीनी ही वाहतूकीकरीता अंशतः खुली करण्यात आलेली आहे. सदर मार्गावरील वाहतुकीचे सर्व सामान्य जनतेच्या हिताकरीता अंशतः बदल करणे आवश्यक वाटत असल्याने विशेष अधिकारांतर्गत तसा निर्देश एम. रामकुमार, अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई. अधिकाराचा वापर करून याव्दारे वाहतूकीचे नियमन करण्याकरिता सुधारीत तात्पुरती अधिसुचना निर्गमित करीत आहेत.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (कोस्टल रोड) मार्गावर बिंदु माधव ठाकरे चौक येथील प्रवेशाचा वेळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 08.00 वा. ते रात्री 08.00 वा. पर्यंत राहील.

तसेच सदर मार्ग हा शनिवार व रविवार व इतर दिवशी 24 तासांकरीता आपात्कालीन परिस्थितीमध्ये (वैद्यकिय / नैसर्गिक आपत्ती / स्थलांतर करणे) आणि महत्वाच्या / अतिमहत्वाच्या व्यक्तींचे मार्गक्रमणाकरीता आवश्यकतेनुसार खुला करण्यात येईल. त्याबाबतचे योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय व मध्य विभाग), वाहतूक व पोलीस उप आयुक्त, (दक्षिण), वाहतूक यांना प्रदान करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0