Daund Breaking News : आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी ; बाजार मैदानात भरविण्याची मागणी

Daund News : दौंड, ता. १५ यवतचा आठवडे बाजार दर शुक्रवारी भरतो यातून मोठ्याप्रमाणावर उलाढाल होते, परंतु हाच बाजार सध्या विक्रेत्यांबरोबरच बाजारकरु व नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. बाजाराच्या दिवशी विक्रेते सेवा रस्त्यावर बसतात त्यामुळे गर्दी होऊन वाहतूक कोंडी असल्याने छोटा मोठा अपघात होऊ शकतो म्हणून आठवडे बाजार मैदानात भरवावा अशी नागरिकांची मागणी आहे. Daund Breaking News

दिवसेंदिवस बाजाराची व्याप्ती वाढत असून हातगाडीवर माल विकणारे, गरम कपड्यांची दुकाने, चारचाकी गाडीतून कलिंगड खरबूज विकणारे चक्क रस्त्यावर बसून विक्री करताना दिसून येत आहेत. या दिवशी खूटबाव, पिंपळगाव, नाथाचीवाडी परिसरातील नागरिकांची वाहने याच रस्त्याने जात असतात. परंतु या रस्त्यावर देखील बाजाराची व्याप्ती वाढत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. अनेकवेळा याठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होवून रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. बाजाराच्या दिवशी विक्रेते महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावर बसतात. त्यामुळे गर्दी होऊन वाहतूक कोंडी असल्याने छोटा मोठा अपघात होऊ शकतो म्हणून आठवडे बाजार मैदानात भरवावा अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्य महामार्गावरील सेवा रस्त्यावर सध्या विक्रेत्यांनी ठाण मांडल्यामुळे प्रशासन झोपी गेले की काय ? असा सवाल नागरिक विचारु लागले आहेत. Daund Breaking News

रस्त्यावर विक्री होत असल्याने ग्राहकही आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळे सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथे नेहमीच वादविवाद होताना दिसतात. याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी केली जात आहे. परंतु याकडे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत.