पुणे

Chota Shaikh sallah dargah pune : छोटा शेख सल्लाह दर्गाह अफवा पसरविल्या प्रकरणी फरासखाना, कोंढवा येथे गुन्हे दाखल

Chota Shaikh sallah dargah

पुणे, दि. 10 मार्च, महाराष्ट्र मिरर :

पुणे महानगर पालिकेकडून छोटा शेख सल्लाह दरगाह कसबा पेठ येथे कारवाई हाती घेण्यात आली असता चुकीची अफवा पसरवून शहराची शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Chota Shaikh sallah dargah pune

दि. 8 रोजी समाज माध्यमांवर छोटा शेख सल्लाह दरगाह बाबत मेसेज वायरल झाल्यानंतर सुमारे ५ ते ६ हजार नागरिक रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती गंभीर झाल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः पुढाकार घेत अफवांबाबत खुलासा केला. यावेळी दरगाह ट्रस्ट व महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी समन्वयाने अनधिकृत बांधकाम काढणे बाबत तोडगा काढला. यावेळी दरगाह ट्रस्ट कडून स्वतः अनधिकृत बांधकाम काढून घेत असल्याचे पत्र लिहून दिले.

छोटा शेख सल्ला दर्गाह कसबा पेठ बाबत चुकीचा संदेश पसरविणाऱ्या व्यक्तींवर फरासखाना व कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस हवालदार प्रमोद लालासाहेब जगताप (वय-44) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शाकीर शेख, मुदस्सर शेख, ताजुद्दीन शेख, इब्राहीम अतार (रा. कसबा पेठ), मुनाफ पटेल (रा. कोंढा), मोईद्दीन सय्यद (रा. पर्वती दर्शन), अस्लम पटेल (रा. कोंढवा), दाऊद शेख (रा. कसबा पेठ), रहिमुद्दीन शेख, जाकीर शेख (रा. मंगळवार पेठ), अन्वर शेख (रा. कसबा पेठ), सलीम मौला पटेल (रा. भिमपुरा कॅम्प), नदीम मुजावर, मतीन अब्दुलरहीम सय्यद (रा. कोंढवा), राहील अब्दुल रहीम सय्यद (रा. कोंढवा), तौफिक रहिमुद्दीन शेख (रा. कसबा पेठ), अहमद सय्यद (रा. भवानी पेठ), रमीज रज्जाक शेख (रा. शिवाजीनगर, जुना तोफखाना), साजीद खान पठाण (रा. लोणार आळी, रविवार पेठ), जाहिद शेख (रा. कोंढवा) यांच्यासह इतरांवर आयपीसी 143, 145, 149, 117, 153/अ, 341 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक जरांडे यांनी फिर्याद दिल्यावरून समीर शेख, किरण शेख, साद खान, बाबाभाई शेख, अख्तर शब्बीर पिरजादे, अहमद खान, रमजान गुलाब शेख, अर्षद इनामदार, खलिल लतिफ सय्यद, अकबर सय्यद यांच्या विरुद्ध भादवि 505 (2) व आयटी ॲक्ट 66 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0