क्राईम न्यूज

Mumbai Cyber Crime News : पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, यशस्वी कामगिरी, 1 कोटी 12 लाख 26 हजार फसवणूक

Mumbai Cyber Crime Department Arrested Criminal : इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या नावाखाली फसवणुक करणाऱ्या आरोपीस अटक

मुंबई :- इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली तब्बल एक कोटी बारा लाख 26 हजार एवढी आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे Mumbai Cyber Crime Office यांनी अटक केली आहे.संदीप चंद्रकांत देशपांडे, (68 वर्षे), यांना, 14 डिसेंबर 2023 ते 6 फेब्रुवारी 2024 दरम्यान विविध व्हॉटसॲप धारकांनी आपआपसांत संगनमत करुन, कट रचून फिर्यादी यांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर ऑनलाईन शेअर मार्केट संबधित नोटिफीकेशन पाठवुन, Jonathan Simon Elite Profit Exchanger वॉटसअप ग्रुपचा सदस्य होण्यास सांगितले व त्याव्दारे शेअर मार्केट मध्ये गुतंवणुक केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगीतले व फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच https://www.alp.-trade.com/#/_या बनावट वेबसाईटवर फिर्यादी यांचे अकाउंट बनवुन त्यामध्ये फिर्यादी यांनी ट्रान्सफर केलेले पैसे व शेअर खरेदी ब्रिकी केले नंतर झालेला नफा दाखविला. त्यानंतर फिर्यादी यांनी झालेला नफा व मुद्दल परत मिळणेकरीता विनंती केली असता त्यांना सदर रक्कमेचा टॅक्स भरावा लागेल असे सांगितले, व त्यासाठी आणखी पैशांची मागणी करून फिर्यादी यांची एकुण एक कोटी बारा लाख 26 हजार रुपये ची आर्थिक फसवणुक केली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाच्या तपासादरम्यान फिर्यादी यांच्या बँक खात्यातून व त्या बँक खात्यामधून पुढे वळती झालेल्या बँक खात्यांबाबतची माहिती संबंधीत बँकांकडून प्राप्त केली. त्यानूसार सदर बँक खात्यांचे स्टेटमेंट्स् चा अभ्यास करून विविध बँकांचे एकुण 33 बैंक खाते गोठविण्यात आले आहेत. गुन्हयाचे तपासादरम्यान एक कोटी बारा लाख 26 हजार रुपये पैकी रू. 82 लाख इतकी रक्कम गोठविण्यात आलेली आहे. Mumbai Cyber Crime News

पोलिसांनी केलेली कारवाई

गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, पोलीस हवालदार सनिल दळवी ,पोलीस शिपाई केशव तकीक या पथकाने तांत्रिक व पारंपारिक पध्दतीने करून सदर गुन्हयातील वर आरोपीताचे नाव निष्पन्न केले व त्यास सदर गुन्हयात अटक केले. अटक आरोपीने व त्याच्या साथीदारांनी बनावट कंपन्या स्थापना करून त्याद्वारे चालू बँक खाती उघडल्याचे व सदर खात्यात फसवणुकीच्या मोठ्या रक्कमांचे व्यवहार झाल्याचे दिसून आलेले आहे. गुन्हयात अधिक आरोपी तसेच त्यांचा इतर गुन्हयात सहभाग निष्पन्न होण्याच्या त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. Mumbai Cyber Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar), विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयकुत (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, दत्ता नलावडे यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, सायबर विभाग आबुराव सोनावणे यांच्या नियत्रंणाखाली पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, तपासी अधिकारी मंगेश मजगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक होळकर, पोलीस हवालदार सुनिल दळवी, पोलीस शिपाई केशव तकीक, यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

मुंबई पोलीसांच्या सायबर गुन्हे Mumbai Cyber Crime Branch शाखेमार्फत जेष्ठ नागरीक व जनसामान्य लोकांना विनंती आहे की, अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या भामटयां पासुन सावध रहावे. सोशल मिडिया द्वारे जाहीराती प्राप्त होतात. अशा जाहीराती मध्ये शेअर मार्केट व कमोडिटी एक्सचेंज मध्ये गुंतवणुकी करीता प्रलोभने दाखविली जातात. अशा पॉन्झी स्कीम मध्ये पैसे गुंतवणुक करू नये. मोबाईल, फोनवरील अनोळखी व्यक्तीला आपला बॅक अकाउंट नंबर, पासवर्ड, ओ.टी.पी., केवायसी, डेबीट कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक अशी संवेदनशील माहिती मागत असतील तर फोन त्वरीत कट करून नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्या वरून कोणतेही मोबाईल ॲप डाउनलोड करू नये तसेच लिंक क्लिक करू नये.आपल्या सोबत सायबर संदर्भात गुन्हा घडल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्र. 1930 संपर्क साधावा आणि आपले नजिकच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा. Mumbai Cyber Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0