धक्कादायक : 3.5 लाखांहून अधिक लोकांचा डाटा हॅक करून, डिलीट करणाऱ्या तीन सायबर भुरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

Nalasopra Cyber Fraud : डाटा डिलीट प्रकरणी कंपनी मालकाचे एक कोटी 51 लाख रुपयांचे नुकसान, सायबर चोरट्यांना नयानगर पोलिसांना केले अटक
नालासोपारा :- नालासोपारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तब्बल साडेतीन लाखाहून अधिक लोकांचा डाटा डिलीट आणि चोरी Cyber Fraud in Nalasopra करणाऱ्या तीन सायबर भुरट्यांना अटक करण्यात नयानगर पोलिसांना Nayanagar Police Staion यश आले आहे. या डाटा डिलीट प्रकरणी कंपन्यांना तब्बल एक कोटी 51 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Data Delete In Nalasopra नया नगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यातील दोन आरोपी हे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नयानगर पोलीस स्टेशन परीसरात राहणा-या राज रामप्रसाद सिंग, (वय 26) , यांचे पुनॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड व ॲब्सोल्यूट सॉफ्ट सीस्टीम प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या मालकीचे मॅजिक लॉकर ” नावाच्या सॉप्टवेअरचे मूळ सोर्स कोडमध्ये हेराफेरी करून व मॅजिक लॉकरच्या सर्वरमध्ये अनाधिकृतपणे ॲक्सेस मिळवून 3.5 लाख अधिक ग्राहकांचा हाटा हार्ट रिसेट (फॉरमेट) केला होता.त्यामुळे फिर्यादीला 1 करोड 51 लाख रुपयांची नुकसान भरपाई ग्राहकांना द्यावी लागली. याची तक्रार फिर्यादी यांनी नयानगर पोलीस ठाणयात दाखल केली होती.पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात भारतीय दंड सहित कलम 420,34 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 43,66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
नया नगर पोलिसांनी गुन्हयाचा तांत्रिक तपासकरुन आरोपी हे वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना उत्तर प्रदेश राज्यातून तर एका आरोपीला विरार मधून अटक केली आहे.मनोजकुमार छोटेलाल मौर्या,हिमांशू अशोक सिंग यांना उत्तर प्रदेश राज्यातून तर चंद्रेश लालजी भारतीया याला विरार मधून अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयासोबत हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कस्टडी सुनावली आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे ,प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -1, मिरारोड, विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, नयानगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक उगले व त्यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग भाट, सहाय्यक फौजदार राजेश काळकुंड, पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे, महेश खामगळ, पोलीस अंमलदार लालाजी लटके,रहमत पठाण तसेच सायबर तज्ञ पुष्कर झांन्टेय, समीर बयाणी यांनी केला आहे.