क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Biggest Drug Racket News : एमडी अंमली पदार्थ जप्त महिलेसह तीन आरोपींना अटक

Mumbai Police Arrested A women With MD Drug Worth 42 Lakh : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कामगिरी;एक महिला आरोपीसह सराईत 03 ड्रग्ज तस्करांना अटक करून 42 लाख किंमतीचा 210 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त

मुंबई ‌:- लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाल्यापासून राज्यातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. राज्यात कुठल्याही प्रकारे गैरव्यवहार किंवा गैरकृत्य होऊ नये तसेच अंमली पदार्थ आणि मद्य,रोख रक्कम यांचे बेकायदेशीर रित्या वाहतूक होऊ नये यावर पोलिसांची करडी नजर आहे.मुंबई पोलिसांच्या Mumbai Police अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून कडक कारवाई करत कोट्यावधी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळ्या विभागात केलेले कारवाई. Mumbai Crime News

1) नागपाडा, मुंबई परिसरातून 120 ग्रॅम एम.डी. जप्त

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे आझाद मैदान युनिटचे Azad Maidan Police Unit पथकाने दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी नागपाडा, मुंबई या परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत एका इसमास अटक केले. त्यांचे ताब्यातून 120 ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रॉन’ एकुण किं. अं. रुपये 24 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपीस 22 एप्रिल 202रोजी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. नमूद गुन्हयाचा पुढील तपास आझाद मैदान युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी हे करत आहे. Mumbai Crime News

(2) मरोळ, अंधेरी, मुंबई परिसरातून 90 ग्रॅम एम. डी. जप्त

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे घाटकोपर युनिटचे Ghatkopar Police Unit पथकाने दिनांक १७/०४/२०२४ रोजी मरोळ, अंधेरी, मुंबई या परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत एकूण एका महिलेसह एक इसमास अटक केले. त्यांचे ताब्यातून 90 ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रॉन’ एकुण किं.अं. रुपये 18 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपीस दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे नमूद गुन्हयातील अटक पुरूष आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. गुन्हयाचा पुढील तपास घाटकोपर युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राघवेंद्र लोंढे हे करत आहे. Mumbai Crime News

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची आतापर्यंतची कारवाई

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन 2024 मध्ये एकूण 22 गुन्हे दाखल करून त्यामध्ये एकूण 55 आरोपींना अटक करत त्यांचे ताब्यातून एकूण 34 किलो 158 ग्रॅम वजनाचे विविध अंमली पदार्थ व 1200 कोडेन मिश्रीत कफ सिरप बॉटल्स असा एकूण अं. किं. रूपये 30.28 कोटी पेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच सन 2024 मध्ये मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करणारे एकूण 15 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 43 आरोपींना अटक केले असून, त्यांचे ताब्यातून एकूण 11.5 किलो पेक्षा अधिक वजनाचा किं.अं. रूपये 22.80 कोटी किंमतीचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त (Mumbai CP Vivek Phansalkar) , बृहन्मुंबई, देवेन भारती,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे व घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार, यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0