क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Alert | सावधान पुणेकर ! ऑनलाईन टास्क, मनी लॉन्डरिंग, शेयर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले : हडपसर, कोंढवा, सिंहगड येथे गुन्हे दाखल

  • एकाच दिवशी हडपसर, कोंढवा, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल

पुणे, दि. २३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Alert

ऑनलाईन टास्क, मनी लॉन्डरिंग, शेयर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले असून पुण्यात एकाच दिवशी हडपसर, कोंढवा, सिंहगड येथे गुन्हे दाखल झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी पुणेकर सावधान होणे गरजेचे आहे. यात महिलांची फसवणूक अधिक होत असल्याचे निदर्शनात येत आहे. काल दाखल तिन्ही गुन्ह्यात महिलांची फसवणूक झाली आहे. Pune Alert,

हडपसर येथे ऑनलाईन टास्कच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक

हडपसर येथील एका ४१ वर्षीय महिलेला पार्ट टाईम कामाचे आमिष देत ऑनलाईन टास्कच्या नावाखाली यु ट्युब व्हिडिओचे लिंक देऊन सबस्क्राईब करण्याचे टास्क देत अंदाजे २५ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली. याबाबत Pune Police हडपसर Hadapsar पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे करीत आहेत.

कोंढव्यात मनी लॉन्डरिंग केस झाल्याचे सांगत १५ लाख उकळले

कोंढव्यात एका ५० वर्षीय महिलेला तुमच्या विरुद्ध मनी लॉन्डरिंग केस चालू असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने १५ लाख रुपये उकळण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत कोंढवा Kondhwa पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील अधिक तपास करीत आहेत.

सिंहगड येथे शेयर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष देत ७ लाखांची फसवणूक

शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा असे आमिष देत एका ५३ वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड Sinhagad road पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे क्षीरसागर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0