Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची विजयी भागदोडा
Maharashtra Assembly Election Results 2024 LIVE Counting and Updates: विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग नवव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते कालिदास कोळंबकर हे निवडणुकीतील पहिल्या विजयाची नोंद करण्याची तयारी करत आहे.
मुंबई :- राज्यातील विधानसभा निवडणुकीचा Maharashtra Assembly Election Results 2024 निकाल आज जाहीर होत असून राज्यात पहिला विजय अजित पवारांच्या उमेदवाराचा झाला आहे. राज्यात पहिला विजय अजित पवारांच्या पारड्यात पडला आहे. अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांनी आपला विजय नोंदवला आहे. आदिती तटकरेंच्या विजयाचे बॅनर आधीपासून मतदारसंघात लागले होते.महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग नवव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते कालिदास कोळंबकर हे निवडणुकीतील पहिल्या विजयाची नोंद करण्याची तयारी करत आहे.
विजय गाठलेले उमेदवार
श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी
जामनेरमधून गिरीश महाजन विजयी
खानापूरमधून सुहास बाबर विजयी
वडाळामधून कालिदास कोळंबकर विजयी