Credit card द्वारे ऑनलाईन फसवणूक ; वैयक्तिक माहिती गोळा करून 1.2 लाखांचा गंडा
Nalasopara Cyber Crime News : सायबर पोलिसांना यश ; क्रेडिट कार्डच्या फसवणुकीमधील संपूर्ण परत मिळून दिले पोलिसांचे कामगिरी
नालासोपारा :- मीरा-भाईंदर वसई-विरार, पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस विभागाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत 1.2 लाख रुपये परत मिळवून दिले. क्रेडिट कार्डचे माहिती घेऊन चोरट्यांनी ऑनलाइन पन्नास हजाराचा गंडा घातला होता. सिद्धिका यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाला या संदर्भात तक्रार दिली होती. Vasai Virar Cyber Crime Department सायबर विभागाने तात्काळ तांत्रिक तपास करून ऑनलाईन फसवणुकीतील 1.2 लाख रुपये म्हणजेच फसवणुकीतील संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देण्यास यश आले आहे.
ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत मिळून दिले
सिद्धीका यांना क्रेडिट कार्ड मधून बोलत आहे असे सांगून आपल्याला जर क्रेडिट कार्ड चालू करायचे असल्यास आम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड संदर्भातली माहिती द्या असा कॉल आला होता. सिद्धीका यांना क्रेडिट कार्ड चालू करायचे होते त्यांना त्या संदर्भातच कॉल आहे असे वाटून त्यांनी त्या संदर्भात क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती कॉल धारकाला दिली आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून 1.2 लाख रुपये गायब झाले. त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी सायबर विभाग मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयात तक्रार दाखल केली. सायबर विभागाने त्वरित तक्रारदार यांनी ऑनलाइन केलेल्या व्यवहाराची तपासणी करून RAZORPAY यांच्या पेमेंट गेटवेच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी NCCRP Portal यांच्याद्वारे ती रक्कम गोठविण्यात आले. त्यानंतर न्यायालयाची पत्रव्यवहार करून तात्काळ सिद्धीका यांच्या खात्यावर ते पन्नास हजार सायबर विभागाच्या पोलिसांनी परत मिळून दिले.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हल, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर, सहाय्यक फौजदार फर्नांडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, प्रविण सावंत यांनी पार पाडली आहे.