पुणे

Baramati Lok Sabha Election 2024 : जुण्या जाणत्यांसोबत सुप्रिया सुळेंचा गावभेट दौरा सुसाट

[ फोडाफोडीसाठी पैसे आहेत ! अंगणवाडी सेविकांसाठी पैसे नाहीत ; सुळे यांचा सरकारवर निशाणा ]

Daund Lok Sabha Election News – दौंड, ता. १९ राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर खासदार सुळे Supriya Sule यांनी गावभेट दौरा सुरू केला आहे. मंगळवारी त्यांनी दौंड ते यवत असा रेल्वे प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद देखील साधला. प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत ता. दौंड येथे गावभेट उपक्रमाअंतर्गत भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.

ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीत खरोखरच दोन गट झाले असल्याचे चित्र प्रथमच यवतमध्ये पाहायला मिळाले. या अगोदरच्या गावभेट दौऱ्याला प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. मंगळवारच्या दौऱ्यात त्यांची कमी होती. त्यामुळे मंगळवारच्या सुळे यांच्या दौऱ्याकडे अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली परंतु सर्वसामान्यांनी आणि निष्ठावंतांनी माञ सुळे यांचे जोरदार स्वागत केले. Baramati Lok Sabha Election 2024

याप्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, सोहेल खान,अजित शितोळे, सचिन काळभोर, आनंद पळसे, विठ्ठल दोरगे, अमित दोरगे, श्रीकांत दोरगे, मयूर दोरगे, शुभम दोरगे, विठ्ठल खराडे, अरविंद दोरगे, अल्ताफ शेख, मोहसीन तांबोळी, हरेश ओझा, उमेश म्हेत्रे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस, शिवसेना, इत्यादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Baramati Lok Sabha Election 2024

यवत मधील आयोजित गावभेट उपक्रमाअंतर्गत सुळे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला, अंगणवाडी सेविकांचा विषय अत्यंत गंभीर आहे. राज्यातल्या ट्रिपल इंजिन खोके सरकारला मला विचारायचे आहे, कार्यक्रम करण्यासाठी इडी, सिबिआय, साठी आणि पक्ष फोडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. पण आमच्या अंगणवाडी भगिणींना पगार वाढ देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, हे दुर्दैव आहे, अशी जळजळीत टिका यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अश्रुंवर उभे असणारे हे सरकार फार काळ टिकणार नाही त्यांना फक्त मोठं मोठे कार्यक्रम करायचे आहेत. अशी टिका करत त्यांनी खोके सरकारचा समाचार घेतला. आम्ही राजकरणात सेवेसाठी आलो आहोत. भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे. भाजपचे नेते अमित शहा यांनाही सुळे यांनी टोला लगावला, त्या म्हणाल्या की भाजपचे नेते शहा यांनी सांगितले होते की एक बोट आमच्याकडे दाखवता तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात. विरोधक असला की घर फोडायची आणि तोच आपल्या बाजुला आला की सगळ विसरून जायचं, अशी यांची वृत्ती असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

दौंड स्टेशनला १६२ रेल्वे गाड्या थांबायच्या आता फक्त ५६ गाड्या थांबतात, वंचित, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी तुमच्याकडे गाड्या नाहीत, वन्दे भारत काय कामाची ती फक्त सोलापूर वरून ती डायरेक्ट पुणे स्टेशनला थांबते, माझा विकासाला आणि वंदे भारत ट्रेनला विरोध नाही, ती जवळपास ८० टक्के मोकळीच धावते, सर्व सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी रेल्वे आहेत, त्या तुम्ही देऊ शकत नाहीत Baramati Lok Sabha Election 2024
ती वंदे भारत काय कामाची ? असाही सवाल सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0