मुंबईक्राईम न्यूज

Dombivli Crime News : डोंबिवलीत महिलेच्या घरी चोरी

डोंबिवली :- ठाणे जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असताना डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 32 वर्षे महिलेच्या घरात चोरी झाल्याचे घटना डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात उघड झाली आहे. महिलेच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले आहे. तीन लाख दोन हजार किमतीचे सोन्याच्या दागिने चोरट्याने लंपास केले आहे. Dombivli Crime News

फिर्यादी महिला (32 वर्षे), या डोंबिवली पूर्व येथे राहत असून ती लॅबटेक्निशियन आहे ती कामानिमित्त बाहेर गेली असता त्यांच्या घरातील लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत. या दागिन्यांची किंमत तीन लाख दोन हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. महिलेच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करत आहे. Dombivli Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0