Uncategorized
Trending

Amol Kolhe: घड्याळ बंद पडला की काय?खासदार डॉ.अमोल कोल्हे

Amol Kolhe On NCP: पोलीस वसाहतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये वेळ न दिल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे टीका

पुणे :- मंचर येथे पोलीस स्टेशन , पोलीस अधिकारी आणि अंमलदार, घोडेगाव येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या इमारतीचे बांधकाम उद्घाटन कार्यक्रम राज्य सरकारने आयोजित केला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून या कार्यक्रम पत्रिकेमध्ये स्थळ आणि दिनांक दिला असून कार्यक्रमाचा वेळ न दिल्याने खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी चांगलीच टीका केली आहे. निमंत्रण पत्रिका ट्विटर वर शेअर करत ते म्हणाले की घड्याळ बंद पडलं की काय? पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे. स्वागताकरिता “तुतारी”वाजवणे विसरू नका. Amol Kolhe On NCP

अमोल कोल्हे यांचे ‌ट्विट

निमंत्रण मिळाले परंतु निमंत्रण पत्रिकेत “वेळ”च लिहिली नाही.. ’घड्याळ’ बंद पडले की काय … असो..पोलीस बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे ..स्वागत “तुतारी” वाजवून करायला विसरू नका..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0