PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौ-यावर, शनिवार करनाल या प्रकल्पाचे उद्घाटन

PM Modi Mumbai Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव-मुलुंड जोडा रस्ता प्रकल्पातील जोड्या बोगदाचे भूमिपूजन करणार
मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi शनिवारी म्हणजेच 13 जुलैला मुंबईत येणार असून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai BMC गोरेगाव मुलुंड रोड रस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालून हा बोगदा जात आहे.
शनिवारी, 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगांव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे.वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी- खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता कसा असेल
•पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता
•पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल.
•पश्चिम उपनगरातून नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वेगाने गाठता येईल.
•नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा होईजोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे 8.80 किलोमीटरने कमी होईल.
•गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी 75 मिनिटांवरून जवळपास 25 मिनिटे होईल.