मुंबई

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला मुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर, म्हणाले ‘मी वेळ वाया घालवतो…’

CM Eknath Shinde On Aaditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. यावर आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूने मोठी प्रतिक्रिया आली आहे.

मुंबई :- एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राबाबतचे भविष्यातील व्हिजन मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी वारंवार दिलेल्या आव्हानाबाबत विचारण्यात आले. आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आले की, आदित्य ठाकरे तुम्हाला सतत आव्हान देत आहेत. तुम्ही वरळीला या किंवा मी ठाण्यात या, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं तर मला महाराष्ट्रासाठी खूप काम करायचे आहे. माझ्यासाठी एक मतदारसंघ महत्त्वाचा नाही. निवडणुकीत कोण कुठे उभा आहे हे जनता ठरवेल. .आणि कोण जिंकते? यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही. हे योग्य वाटत नाही. मला यावर वेळ घालवायचा नाही.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झाली. मात्र, त्यानंतर आदित्य ठाकरे हे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करत आहे. यातच वारंवार निवडणुकीचे आवाहन आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत आहेत. तुम्ही माझ्या वरळी मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी या किंवा मी तुमच्या ठाणे मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी येतो, असे आवाहन आदित्य ठाकरे देत आहेत. या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत उत्तर दिले नसले तरी आता एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. त्यांच्या प्रश्नाला श्रीकांत शिंदे आणि त्यांचे सहकारी उत्तर देत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0