मुंबई

Ambadas Danve : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलेल्या जुन्या व्हिडिओला शिवसेनेकडून प्रत्युत्तर

Ambadas Danve Reply To Chandrashekhar Bawankule : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडून बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका.

मुंबई :- राहुल गांधी यांची भारत न्याय जोडे यात्रा रविवारी (17 मार्च) मुंबईच्या शिवाजी पार्क येथे समारोह त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली या सभेत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तसेच इंडिया आघाडीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेबांचा एका मुलाखतीचा जुना व्हिडिओ ट्विट करत “मे मेरी शिवसेना को काँग्रेस नही होने दूंगा”असे मुलाखतीचे व्हिडिओ ट्विट केला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला त्याला शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. Ambadas Danve Reply To Chandrashekhar Bawankule

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे काय म्हणाले

२०१४ साली विजयाच्या धुंदीत एका फोनवर तुम्ही युती तोडली, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख देहाने भूतलावर नव्हते. हे तुम्ही भाग्य समजा.

याउपर जाऊन राष्ट्रवादीचा आवाजी मतदानाने पाठिंबा घेऊन आपण २०१४ साली सरकार स्थापन केले होते, हे लोकांना लक्षात आहे. तेव्हा मोठे साहेब असते तर ज्या भाषेत तुमच्यावर प्रहार झाला असता, तो तुम्हाला सहन झाला नसता. उगाच त्यांचे दाखले कशाला देता.

त्यांनी हयातभर भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती. ही देखील त्यांचीच शिकवण आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खोटा पुळका आहे तुम्हाला, जर हे प्रेम खरे असते तर एव्हाना तुम्ही त्यांना भारतरत्न देऊन मोकळे झाले असता..

चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणता व्हिडिओ ट्विट केला

शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. तत्पूर्वी या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने देशभक्ती, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचेही स्मारक आहे, ज्यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, पण माझे दुकान बंद करू.’ राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करत नाही. . ते का करत नाही, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे असेल का? आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे.आज या शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी विसरले असतील, तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका! ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0