मुंबई

BJP Leaders On Uddhav Thackeray : “आपकी बार भाजप तडीपार”, उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या नाऱ्यावर भाजपाकडून कडाडून टीका

•उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान भाजपावर कडाडून टीका केली होती त्यानंतर भाजपकडूनही उद्धव ठाकरे यांचा समाचार घेण्यात आला

मुंबई :- शिवाजी पार्क दादर येथे झालेल्या भारत न्याय जोडो यात्रेचा सांगता जाहीर सभेत करण्यात आला आहे. या सभेत देशातील इंडिया आघाडीचे प्रमुख पक्षातील आठवण अधिक महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित होते या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत “आपकी बार भाजप तडीपार असा नारा दिला” या राजकीय घडामोडीनंतर भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. BJP Leaders On Uddhav Thackeray

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले

आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. BJP Leaders On Uddhav Thackeray

मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. BJP Leaders On Uddhav Thackeray

आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली

“आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला ? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का ? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झालीये.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली.. अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले. एवढंच नव्हे तर, काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल”, आता खंजीर, वाघ, मर्द.. कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल !!”, असे खोचक ट्विट केले आहे. BJP Leaders On Uddhav Thackeray

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0