Uncategorized

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांची टिका

Rohit Pawar On Devendra Fadnavis : रोहित पवार यांच्या टीकेला भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून प्रत्युत्तर.

मुंबई :- शनिवारी (16 मार्च) एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस Rohit Pawar यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य खूप गाजले होते. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, केवळ सत्ता आणि खुर्चीसाठी ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. नंतर अहंकारी असल्याची टीका आमच्यावर केली. त्यानंतर सत्तेत पुन्हा यायला अडीच वर्ष लागली खरी, पण आलो तर असा आलो की दोन पक्ष तोडून आलो आणि एकटा नाही तर आणखी दोघांना घेऊन आलो, असे फडणवीस म्हणाले होते.
तुमच्याच औषधाची चव तुम्हाला घ्यायला लावली असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटण्यावर भाष्य केले होते. यावर रोहित पवार यांनी टीका केली होती. त्यावर आता चित्रा वाघ यांनीही पलटवार केला आहे. Rohit Pawar On Devendra Fadnavis

आमदार रोहित पवारांची टीका

फडणवीस यांच्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती. राज्यातील पक्ष आणि कुटुंबे फोडाफोडीचे महामेरू कोण आहेत, याबाबत लोकांमध्ये चर्चा होती, पण खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याची कबुली दिल्याने लोकांमधील चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. पण फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती राबवणाऱ्या भाजपाला राज्यातील स्वाभिमानी जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला होता.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे ट्विट काय?

“ही न्यारीच तहऱ्हा आहे तुम्हा मंडळींची… देवेंद्र फडणवीस यांना पक्षफोडीचा मेरूमणी म्हणताना आपल्याच पक्षात फोडतोडीच्या राजकारणाचा पर्वतशिरोमणी एव्हरेस्ट आहे, हे तुम्ही कसे विसरता. फडणवीस यांनी केली तर ती फोडा आणि झोडा नीती आणि तुम्ही केली तर चाणक्यनीती”, असे चित्रा वाघ म्हणाल्या.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तुमच्याच औषधाची चव तुम्हाला घ्यायला लावली. त्याच्या जालीम कडवटपणामुळे तुमची तोंडे अजूनही उतरलेलीच आहेत, हे कबूल करा. जनतेने दिलेला कौल अव्हेरत अभद्र युती केलेल्या सत्ताहडप्यांना फडणवीस यांनी शिकवलेला हा धडा आहे. पुढेही तुम्ही तो नीट ध्यानात ठेवा”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0