Dombivli Crime News : डोंबिवलीत खून ; वहिनीने केला दिराचा खुन
• Dombivli Crime News भावाला जेवण का देत नाही? दिराने विचारले, वहिनीचा राग आणावर चाकूने छातीत वार
डोंबिवली :- मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या घटनेने एकच खळवळ उडाली आहे. शुल्लक कारणावरून वहिनीने दिराच्या छातीत चाकू गुपसून जीवे ठार मारले आहे. त्यानंतर स्वतः हाताचे नस कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महिलेच्या विरोधात 302 प्रमाणे डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dombivli Crime News
रविवार 05 मे रोजी दुपारी 3.30 वा. चे सुमारास, सागर नारायण मेंगाने, (38 वर्षे) हे त्यांची वहिनी संगिता संदिप मेंगाने, (34 वर्षे), (रा.सोनारपाडा, डोंबिवली पूर्व) हिस त्यांचा भाऊ संदिप नारायण मेंगाने यांस जेवण का देत नाहीस, हे विचारण्यासाठी गेले असता, आरोपी महिला हिने सागर मेंगाने यांचेसोबत भांडण करून त्यांचे छातीत चाकु भोकसून त्यांस जिवे ठार मारले आहे. त्यानंतर आरोपी संगिता संदिप मेंगाने हिने स्वतःचे डाव्या हाताची नस कापुन जखमी झाल्याने तिस एम्स हाॅस्पीटल, डोंबिवली पूर्व येथे ॲडमिट केले आहे सदर प्रकाराबाबत मयत इसमाची पत्नी फिर्यादी महिला, (33 वर्षे), (रा.सोनारपाडा, डोंबिवली पूर्व) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चोपडे हे करीत आहेत. Dombivli Crime News