पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : दिवाळीच्या सुट्टीत पीएमपीएमएलची विशेष पर्यटन बससेवा; पुणे व परिसरातील ‘या’ प्रसिद्ध ठिकाणांना करता येणार सफर

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर – दिवाळीच्या सुट्टीत पुणे आणि परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य पर्यटनस्थळांना नागरिकांना भेट देता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) अत्याधुनिक वातानुकूलित (एसी) स्मार्ट इलेक्ट्रिक बसेसद्वारे विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या किफायतशीर सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पीएमपीएमएलतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. प्रति प्रवासी तिकीट दर केवळ ५०० रुपये ठेवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कुठे कुठे प्रवास करता येईल? (प्रमुख मार्ग व ठिकाणे):
या पर्यटन बससेवेअंतर्गत प्रवाशांना अनेक आकर्षक मार्गांवर प्रवास करता येईल:
मार्ग १ व २: हडपसर गाडीतळ आणि स्वारगेटहून इस्कॉन मंदिर, कानिफनाथ गड, मोरगाव गणपती, जेजुरी, सासवड (सोपानकाका व संगमेश्वर मंदिर), नारायणपूर आणि म्हस्कोबा मंदिर (कोडीत)..https://maharashtramirror.com/ Pune News
मार्ग ३ व ४: पुणे स्टेशन व डेक्कन जिमखाना येथून शिवसृष्टी (आंबेगाव), स्वामीनारायण मंदिर, कोंढणपूर, बनेश्वर मंदिर, बालाजी मंदिर (केतकावळे), पु. ल. देशपांडे गार्डन, निळकंठेश्वर पायथा आणि झपूर्झा संग्रहालय.
मार्ग ५ ते ८: खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धबधबा, थेऊरचा गणपती, रांजणगाव गणपती, मोराची चिंचोली, पाबळ, भीमा कोरेगाव विजय स्तंभ, आळंदी, देहूगाव (गाथा मंदिर) आणि भंडारा डोंगर.
मार्ग ९ ते ११: हाडशी (श्री सत्य साईबाबा आश्रम), मुळशी धरण (बोटिंग व शिवालय मंदिर), चाकण (राजगुरू स्मारक), आळंदी (संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ) आणि लोणावळा-कार्ला परिसरातील पर्यटनस्थळे.
मार्ग १२ ते १३: भुलेश्वर मंदिर, हिवरे, सासवड परिसरातील प्राचीन मंदिरे, तळजाई माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चतुःशृंगी मंदिर आणि लोणावळा-नारायणी धाम.
बुकिंग आणि सवलतीची माहिती:
या बससेवेचे बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन येथील पास केंद्रांवर करता येईल. तसेच ३३ प्रवाशांच्या ग्रुपने बुकिंग केल्यास ५ प्रवाशांच्या तिकीटदराइतकी (शंभर टक्के) सवलत दिली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक बसमध्ये मार्गदर्शक (गाईड) नेमण्यात आला असून, आरक्षित तिकिटावर घरापासून बसच्या थांब्यापर्यंत पीएमपीएमएलच्या अन्य बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button