Pune News : दीवाळीच्या खरेदीत ऑनलाइन लाइव्ह शॉपिंगचा ट्रेंड; दुकानांसोबतच घरबसल्या खरेदीला महिलांची पसंती
Pune News : स्मिता कुलकर्णी
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर ः दिवाळी म्हटली की नवनवीन कपडे, आकर्षक साड्या आणि फॅन्सी वस्तूंची खरेदी आलीच! सणासाठी आवडीचे कपडे खरेदी करण्याकरिता बाजारपेठांमध्ये महिलांची लगबग सुरू असतानाच आता ऑनलाइन लाइव्ह शॉपिंगचा ट्रेंडही चांगलाच रुजला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या ड्रेस, साड्या आणि विविध फॅन्सी कपड्यांचे कलेक्शन पाहण्याची आणि आवडीनुसार खरेदी करण्याची संधी मिळत असल्याने महिलांकडून ऑनलाइन खरेदीला पसंती दिली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
ऑनलाइन विक्रेत्यांकडून दररोज सोशल मीडियावर लाइव्हच्या माध्यमातून नवनवीन कपड्यांचे कलेक्शन सादर केले जाते. यामध्ये ड्रेसची लांबी, रुंदी आणि साइज मोजून दाखविली जाते. तसेच उपलब्ध रंग, कपड्यांचा दर्जा, डिझाइन यांची माहिती दिली जाते. साड्यांचेही विविध प्रकार, रंग आणि आकर्षक डिझाइन प्रत्यक्ष दाखविले जात असल्याने ग्राहकांना खरेदीपूर्वी कपड्यांची माहिती मिळते. त्यामुळे आवडीनुसार आणि गरजेनुसार योग्य कपड्यांची निवड करणे सोपे झाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
विशेष म्हणजे, चांगल्या दर्जाचे कपडे किफायतशीर किमतीत उपलब्ध होत असल्याने ऑनलाइन खरेदीकडे महिलांचा कल वाढत आहे. दररोज नवीन कलेक्शन पाहायला मिळत असल्याने ग्राहकांनाही लाइव्हची उत्सुकता असते. आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी लाइव्ह पाहता येत असल्याने वेळेची बचत होते. बाजारपेठेतील गर्दी, वाहतूक आणि खरेदीसाठी लागणारा वेळ वाचत असल्याने नोकरदार महिलांसह गृहिणींसाठीही हा पर्याय सोयीचा ठरत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कपड्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. एका ऑनलाइन विक्रेत्याच्या माहितीनुसार, नियमितपणे मोठ्या प्रमाणात कपड्यांची पार्सल पाठविली जातात. मात्र, दिवाळीनिमित्त सध्या दररोज जवळपास २०० हून अधिक साड्या, ड्रेस आणि फॅन्सी वस्तूंची पार्सल ग्राहकांना पाठविली जात आहेत. मालाचा दर्जा आणि किफायतशीर दर यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत असून, ऑनलाइन विक्रेत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एकीकडे पारंपरिक बाजारपेठांमधील खरेदीची रंगत कायम असताना दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या मदतीने घरबसल्या होणारी ऑनलाइन खरेदी महिलांसाठी नवा आणि सोयीस्कर पर्याय ठरत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या खरेदीत दुकानांसोबतच ऑनलाइन लाइव्ह शॉपिंगचीही चांगलीच चलती पाहायला मिळत आहे.
“आमच्याकडून दररोज मोठ्या प्रमाणात कपड्यांची पार्सल पाठविली जातात. मात्र, दिवाळीच्या सणानिमित्त मागणीत मोठी वाढ झाली असून, सध्या दररोज जवळपास २०० हून अधिक साड्या, ड्रेस आणि फॅन्सी वस्तूंची पार्सल ग्राहकांना पाठविली जात आहेत. आमच्या मालाचा दर्जा आणि चांगली क्वालिटी यामुळे ग्राहकांचा आमच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे.”— अक्षदा वायकर मधुश्री क्रिएशन, ऑनलाइन कपडे विक्रेते



