Pune News : रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा ; मुंढवा पोलीसांकडून कौतूक
- Pune News : वपोनि महेश बोळकोटगी यांच्याकडून प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या रिक्षा चालकाचा सत्कार
पुणे, दि. 15 एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर :
कलयुगात माणूस माणूसकि विसरून जात असताना, काही दैवी शक्ती माणूसकीला जिवंत ठेवण्यासाठी मानवी रूपात दृष्टांत देत असतात. असाच काहीसा प्रकार मुंढवा पोलीस ठाण्यात अनुभवास आला. प्रवाशाची हरवलेली बॅग कुठलाही लोभ न बाळगता रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात आणून देत प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले. Pune News
पुणे शहरात रिक्षा चालवून कुटूंबियाचा उदरनिर्वाह करणारे राजेश चंद्रकांत संघावार, वय ५६ वर्षे, रा. शिंपी आळी, कॅम्प, पुणे हे मुंढवा पोलीस ठाणे परिसरामध्ये रिक्षा व्यवसाय करीत असतांना एका ग्राहकांची लॅपटॉप बॅग मिळुन आली. सदर बॅगमध्ये लिनीओ कंपनीचा अंदाजे ७०,०००/- (सत्तर हजार रुपये किंमतीचा) व इतर महत्त्वाचे कागदपत्र मिळुन आले. महागड्या लॅपटॉपचा कोणताही लोभ न करता, आर्थिक आपेक्षा न धरता सदर बंगमधील कागदपत्राची व इतर वस्तुंची पाहणी करुन कोणता संपर्क होवून माहिती मिळते काय याबाबत खात्री केली परंतू काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. सदरचा लॅपटॉप बॅगमध्ये पासवर्ड लिहुन ठेवलेल्या मिळाल्याने सदर पासवर्डच्या मदतीने लॅपटॉप लॉक खोलून लॅपटॉपचे जी-मेल वरुन ई-मेल आयडी प्राप्त केला व त्यावर लॅपटॉप बॅग मिळुन आली असल्याचा संदेश दिला, सदरचा संदेश लॅपटॉप मालक सुरज हेमराजनी यांना प्राप्त झाल्याने व कामाचे निमित्त बाहेर असल्याने त्यांनी त्यांचे प्रतिनिधी शेखर हीरवे यांना पाठवून दिले. सदर व्यक्ती लॅपटॉपचा मुळ मालक नसल्याने योग्य खातर जमा करणे आवश्यक वाटत असल्याने रिक्षा चालक राजेश चंद्रकांत संघावार व त्यांचे सहकारी हे शेखर हिरवे यांना घेवून पोलीस ठाणे येथे आले.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी प्रथम रिक्षा चालक राजेश संघावार यांचे कामगिरी व इमानदारीचे कौतुक केले. तसेच सदर लॅपटॉप घेणेसाठी आलेले प्रतिनिधी व मुळ मालक यांचे बाबत योग्य खातरजमा करुन परत करणे करीता ठाणे अंमलदार सचिन अडसुळ यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे योग्य खात्री करुन सदरचा लिनीओ कंपनीचा अंदाजे ७०,०००/- (सत्तर हजार रुपये किंमतीचा) लॅपटॉप परत करण्यात आला आहे. सदरचा लॅपटॉप परत मिळाल्याने शेखर हिरवे, सुरज हेमराजनी व इतर स्थानिक नागरिक यांनी रिक्षा चालक राजेश संघावार यांचे व पोलीस दलाचे चांगले कामगिरीचे कौतुक केले आहे.
रिक्षा चालक राजेश संघावार यांनी त्यांचे हालाकीचे व गरीब परिस्थिती व कष्टाचे काम करीत असतांना देखील कोणताही लोभ न बाळगता सदरचा लॅपटॉप पोलीस ठाणेस येवून मुळ मालकास परत करुन मानुसकीचे उत्तम उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. त्यांचे उत्कृष्ट कामाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दखल घेवून त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.
सदरची कामगिरी Pune Police पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, पोलीस अंमलदार सचिन अडसुळ, तानाजी देशमुख, निलेश पालवे, शितल मेमाणे, प्रितम लाड, मनिषा बर्वे यांनी केली आहे.