ठाणेक्राईम न्यूज

Thane Crime News : आई-वडिलांनीच केली आपल्या चिमुकलीची हत्या, मुलीच्या अंगात शैतान असल्याचे

स्वतःच्या मुलीचा निर्घणपणे खुन करून मृतदेह पुरणा-या आई-वडीलांना मुंब्रा पोलीसांनी केली अटक,

ठाणे :- आई-वडिलांनी आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची घटना मुंब्रात उघड झाली आहे या घटनेमुळे मुंब्रा ते एकच खळबळ उडाली असून हत्या मागचं कारण अतिशय न शोभणारे आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना म्हणजेच आई-वडिलांना हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. (05 एप्रिल) रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 ठाणे यांचे अर्जदार संतोष हरिलाल महादेव यांचे नावे करण्यात आलेला अर्ज 4 एप्रिल रोजी प्राप्त झाला. अर्जातील आशय व फोटो पाहुन गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस ठाणे हद्दीतील हॉस्पिटल्स आणि कबरस्थान चेक करून मयत मुलगी लबीबा शेख 1.5 वर्षे हिस दिनांक 19 मार्च रोजी रात्री 2.30 वा. दफन केल्याबाबत माहिती प्राप्त केली, मेडफॉर्ड हॉस्पिटल व अलमास हॉस्पिटल यांचेकडे सदर अर्जाचे अनुषंगाचे चौकशी करून, मुलगी लबीबा शेख वय 1.5 वर्षे हिच्चावर करण्यात आलेल्या उपचाराची माहिती प्राप्त केली. मेडफॉर्ड हॉस्पिटल व अलमास हॉस्पिटल यांच्या मधील मुलींच्या उपचाराचा बाबत विसंगती आढळुन आली. तसेच गैरअर्जदार 1) जाहीद सलामत शेख, (38 वर्षे) 2) बुरानी जाहीद शेख, (28 वर्षे), यांचेकडे चौकशी केली असता, मुलीचे आई – वडील हे मुलीच्या मृत्युचे कारण लपवीत असल्याचे त्यांचे जबाब वरूण स्पष्ट झाले होते.

यातील मयत मुलगी नामे लबिबा शेख वय 1.5 वर्षे हिस आरोपी १) जाहीद सलामत शेख, (38 वर्षे) २) नुरानी जाहीद शेख, (28 वर्षे), यांनी आपसात संगणमत करून मुलीच्या अंगात सैतानाचा वास असल्याचे म्हणत तिच्या आई-वडिलांनी तिला स्मशानात नेऊन तिला संपवलं आहे.नाहक अंधश्रद्धेच्या आहारी जात आई वडिलांनीच पोटच्या लेकराचं अंत केला आहे. धारदार शस्त्राने डोक्यावर व डोक्याचे मागील बाजुस वार करून गंभीर जखमी केले, त्यात तिचा मृत्यू झाला आहे. मृत्यु नंतर सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती न देता तसेच रूग्णालयात मयत मुलगी लबीबा शेख वय 1.5 वर्षे हिचे दुखापतीबाबत चुकीची माहिती देवून, त्याबाबत हॉस्पिटलची मृत्यू दाखला (डि.सी.) प्राप्त करून घेवून मयत मुलगी रितीरिवाजाप्रमाणे विधीयुक्त कौसा कब्रस्थान येथे पुरलेले (दफन) केले म्हणुन, मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवि कलम 302,281,34 प्रमाणे दाखल करून दिनांक 05 एप्रिल रोजी 04.31 वा. दाखल करण्यात आला,

गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने मुलीवे विधीवहीत दफन केलेले शव न्यायालयाचे आदेशाने, नायब तहसिलदार, वैदयकिय अधिकरी, पंच याचे समक्ष बाहेर काढून शवावर शवविच्छेदन छत्रपती शिवाजी महाराज सायन हॉस्पिटल येथे करून, वैदयकिय अधिकारी यानी दिलेल्या अभिप्रायावरून multiple incised wound over scalp असे दिल्याने “फाईनल ओपिनियन रिझर्व केमिकल ॲनालेसीस रिपोर्ट” असे दिले असुन, सदर मुलीचा मृत्यु हा तिचे डोक्यावर केलेल्या जखमांमुळे झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने 10 एप्रिल रोजी अटक मयत मुलीच्या आई वडील यांना अटक करण्यात आले आहे.1) जाहीद सलामत शेख, (38 वर्षे) 2) नुरानी (खातुन) जाहीद शेख, (28 वर्षे), अमृतनगर मुंब्रा यांना अटक करण्यात आले आहे. गुन्हयाचा तपास पुढे चालु आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbare, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक‌ अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री संजय दवणे, सह तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तपास केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0