Pune Crime News | कोंढव्यात गुंडावर एमपीडीए कारवाई
Pune crime news : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश
पुणे, दि. 23 मार्च, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune crime news
पोलीस आयुक्त अमितेश कुमार CP Amitesh Kumar यांनी विशेष अधिकाराचा वापर करून कोंढव्यातील गुंडावर एका वर्षाकरिता स्थानबद्धतेचे (MPDA) आदेश निर्गमित केले आहेत. Pune Crime News
अरबाज अहमद पटेल, वय 21 वर्ष, रा.पवार हाईट्स, तिसरा मजला, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे याचे विरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी नामे अरबाज पटेल, वय 21 वर्ष, रा. पवार हाईट्स, तिसरा मजला, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे यास आदेश क्रमांक/ पीसीबी/स्थानबद्ध/कोंढवा/ पटेल/ दिनांक 18/03/2024 अन्वये उक्त अधिनियमाच्या कलम 3(2) नुसार अकोला कारागृह अकोला येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश होते.
आरोपीचा शोध घेणेबाबत संतोष सोनवणे पोलिस निरीक्षक कोंढवा पुणे यांनी तपास पथकास आदेशित केले असता सदर आरोपीचा शोध घेत असता पोलिस अंमलदार अक्षय शेंडगे व शशांक खाडे यांना त्यांचे बतमिदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून आरोपी नामे अरबाज अहमद पटेल यास कोंढवा हद्दीत साळवे गार्डन येथून ताब्यात घेण्यात आले. कोंढवा पोलिस स्टेशन येथे आणून त्याचे विरुद्ध एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई करण्यात आली.
सदर कामगिरी Pune Police अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, गणेश इंगळे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मानसिंघ पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली लेखाजी शिंदे सहा पो निरी, बालाजी दिगोळे पोलिस उप निरीक्षक, पोलिस हवालदार अमोल हिरवे, पोलिस हवालदार राहुल वंजारी, पोलीस अंमलदार अभिजित रत्नपारखी, रोहित पाटील, पो अम सुहास मोरे, पो अम थोरात,पो अम अक्षय शेडगे, पो अम गरुड, भोसले, विकास मरगळे, राहुल रासगे, शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.