महाराष्ट्र

Chitra Wagh On Praniti Shinde : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला

•काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारादरम्यान भाजपवर निषेला चालला त्यावर भाजपाने त्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले

सोलापूर :- स्वस्त प्रचाराच्या मोहात भाजपला टारगेट करू नका. गुंड पाळणं ही भाजपची संस्कृती नाही. गुंड पाळणाऱ्या पक्षांना आम्ही घरी बसवलंय असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी पंढरपुरात आपल्या वाहनावर हल्ला झाल्याचा दावा केला होता. तसेच हल्ला करणारे भाजपचे लोक होते असा आरोप देखील त्यांनी केला होता. यावरून चित्रा वाघ यांनी जोरदार पलटवार केला आहे.

ट्विट करत चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, “काही जण निवडणूक जिंकण्यासाठी जनतेपर्यंत जातात आणि त्यांची कामे करतात. काही जणांना शॉर्ट कट मारायचा असतो. ते स्टंट करतात. अशाच आमच्या एका स्टंटबाज भगिनींचा व्हिडिओ फिरवला जातोय. त्या भगिनी म्हणजे आपल्या सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणितीताई शिंदे झालं असं की, कुठून तरी सभेवरून येत असताना ताईंची गाडी अडवण्यात आली. आता आपल्या कामांसाठी जनता लोकप्रतिनिधींकडे जाणार नाही मग कुणाकडे जाणार ? काही समाजबांधवांच्या आपल्या मागण्यांसंदर्भात तीव्र भावना होत्या. त्या त्यांनी प्रणितीताईंच्या कानावर घातल्या. बिचारे थोडे संतापलेले होते. तेही साहजिक आहे. ही मंडळी काय म्हणताहेत, हे त्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय.

त्यांची नेमकी मागणी काय आहे, तेही समजतंय”, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला ‘हे’ शोभत नाही तसेच “या लोकांवरच गुरकावून त्या फणकाऱ्यानं गाडीत बसून चालत्या झाल्यात. नंतर त्या आरोप करत सुटल्यात की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला. आपल्यावर हल्ला करणारे भाजपचे गुंड होते. मला स्पष्ट करायचंय की, एक तर ही लोकं भाजपचे कार्यकर्ते तर अजिबातच नव्हते. शिवाय, आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या म्हणून जे कुणी ते लोक आहेत, त्यांना गुंड म्हणणे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. प्रणितीताई, तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांची लेक आहात. आपल्याकडे गाऱ्हाणी घेऊन आलेल्यांच्या समस्या त्यांनी कशा सोडवल्या, हे जरा त्यांना विचारा”, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे. तर तशाच भाषेत उत्तर देऊ चित्रा वाघ यांनी यावेळी प्रणिती शिंदे यांना इशाराही दिला आहे. “उगीच स्वस्त प्रचाराच्या मोहात गुरफटून भाजपला टारगेट करू नका. गुंड पाळणं ही भाजपची संस्कृती नाही. गुंड पाळणाऱ्या पक्षांना आम्ही घरी बसवलंय. त्यामुळे बेछूट आरोप कराल तर तशाच भाषेत उत्तर देऊ”, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका दरम्यान, माझ्याकडे सोसायटी, बँक आणि कारखाना नसल्यानी ईडीबिडीची भिती नाहीये, त्यामुळे मी भाजप विरोधात बोलणारच, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. निवडणूकीच्या तोंडावर 2 रुपयांनी पेट्रोलचे भाव कमी करून भाजप लोकांना वेड्यात काढत आहे. तरी पण आपण जर भाजपला मतदान केले तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0