Nalasopara Crime News : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; 1 पिस्तूल व 5 जिवंत काडतूस जप्त

•नालासोपारा येथील साई सिटी भागात पिस्तूल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना विरार गुन्हे शाखा कक्ष-3 सापळा रचून अटक केली
नालासोपारा :- नालासोपाराच्या साई सिटी येथील खारटन भागात पिस्तूल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना विरार गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी सापळा रचून अटक केली आहे.पोलिसांनी या त्रिकुटाकडून 1 पिस्तूल व 5 जिवंत काडतूस जवळपास 3.55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे.कारवाईत पोलिसांनी आरोपींची व्हॅगनार कार देखील जप्त केली आहे. या तिघांनी सदरचे पिस्तूल व काडतूस कुठून आणले याचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
नालासोपारा येथील साई सिटी खारटन भागात राहणारे काही तरुण पिस्तूल आणि काडतूस विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सुहास कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अविनाश अंबूरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे व त्यांच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तीनही आरोपींच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा शस्त्रअधिनियम 1959 चे कलम 3,25 (1) (क) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (क), 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरी चरील नमूद आरोपींना पुढील कारवाई करीता नालासोपारा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
अटक आरोपींची नावे
1.अब्दुल करीम शेख (वय 26 रा.कुरेशी नगर, हरी मस्जिद जवळ, कुर्ला पूर्व, मुंबई)
2.सद्दाम अब्बासअली शेख (वय 23 , रा. नेरुळ, जईनगर-गांधीनगर झोपडपट्टी, नवी मुंबई)
3.राजकुमार मातादीन गौतम (वय 24, रा.तहसील बदलापुर, जिल्हा जौनपुर, राज्य उत्तरप्रदेश)
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सो (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे,प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.