Haryana Municipal Corporation Election Results 2025 LIVE Updates: हरियाणाच्या महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला, गुरुग्राम, फरिदाबाद, पानिपतमध्ये भाजपचा मोठा विजय

Haryana Municipal Corporation Election Results 2025 LIVE Updates: हरियाणा महापालिका निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. पक्षाने रोहतक, फरिदाबाद, कर्नाल, हिस्सार, पानिपत, गुरुग्राम, सोनीपत आणि अंबाला येथे काँग्रेसचा पराभव केला आहे.
ANI :- हरियाणात 2 आणि 9 मार्च रोजी 9 महापालिकांसह 40 संस्थांसाठी मतदान झाले होते. बुधवारी (12 मार्च) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. Haryana Municipal Corporation Election Results 2025 LIVE Updates पानिपत महानगरपालिकेची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार कोमल सैनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सविता गर्ग यांचा 1,23,170 मतांनी पराभव केला. तर 23 प्रभागात भाजपला तर 3 प्रभागात अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.तर काँग्रेसच्या उमेदवार सविता गर्ग यांना 38,905 मते मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रीतपाल खेडा यांना 46,864 मते मिळाली असून आझाद उमेदवार केवल सिंह यांना 7,295 मते मिळाली आहेत.
रोहतक महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल पक्षाने भाजपचे उमेदवार रामावतार वाल्मिकी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाने X वर लिहिले आहे की तिहेरी इंजिन सरकार आपला “विकसित हरियाणा-विकसित रोहतक” चा संकल्प साकार करेल आणि क्षेत्राचा तिप्पट वेगाने विकास करेल.रोहतक हा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा बालेकिल्ला मानला जातो.
गुरुग्राम महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीतही भाजपला यश मिळाले. या निवडणुकीत भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार राजराणी यांचा 1,79,485 मतांनी विजय झाले आहे.
सोनीपत महानगरपालिकेच्या महापौर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजीव जैन यांनी काँग्रेसचे उमेदवार कमल दिवाण यांचा सुमारे 34 हजार 766 मतांनी पराभव केला आहे.
अंबाला शहरातील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपने प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार शैलजा सचदेवा 20,487 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार अमिषा चावला यांचा पराभव केला आहे. 2019 नंतर अंबाला शहरातील मोठ्या निवडणुकीत भाजपचा हा पहिला विजय आहे.माजी राज्यमंत्री असीम गोयल म्हणाले की, मुख्यमंत्री नायब सैनी यांना मुख्यमंत्री होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यासह आज भाजपने विजयाचा षटकार ठोकला आहे. आता ट्रिपल इंजिन सरकारमध्ये विकासाचे चाक वेगाने फिरणार आहे.