Pune police news | दोन वर्षापासून महिलेची तक्रार दूर्लक्षित : या पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याचा मनमानी कारभार …
दोन वर्षापासून महिलेची तक्रार दूर्लक्षित : या पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याचा मनमानी कारभार …
- पोलीस आयुक्त लक्ष देतील काय ?
पुणे, दि. 6 मार्च, (मुबारक जिनेरी) महाराष्ट्र मिरर :
दोन वर्षापासून पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवून तक्रार दाखल होत नसल्याने अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. परिमंडळ 5 हद्दीतील वानवाडी पोलीस ठाणे येथे गेल्या दोन वर्षांपासून अर्ज प्रलंबित ठेवून महिलेशी उद्धट वर्तन व त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. Pune police news
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कामाची धमक पाहून महिलेला न्याय मिळण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.तक्रारदार महिला फिलोमिना चाऊस यांची हॉटेल व्यवसायात गुंतवणूकीचे आमिष दाखवून सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सन २०२२ मध्ये एका ईसमाने चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सदर महिलेकडून वेळोवेळी सुमारे ३५ लाख रुपये गुंतवणूकीसाठी घेतले. गुंतवणूकीवर परतावा मागितला असता सदर इसमाने आज देतो उद्या देतो असे सांगून टाळाटळ केली व रकमेसह पश्चिम बंगाल येथे पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झालेनंतर वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक यांनी मनमानी पद्धतीने अर्ज प्रलंबित ठेवून, महिलेस उद्धट वागणूक देत न्याया पासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.