मुंबई

Dance Bar Raid : ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार, पोलीसांची मोठी कारवाई

Mumbai Raid On Dance Bar : अंधेरी पूर्व परिसरात बेकायदेशीरपणे डान्सबार छापा, पोलिसांच्या अंमलबजावणी, गुन्हे शाखेने कारवाई

मुंबई :- ‘श्रीरामभवन रेस्टॉरन्ट ॲन्ड बार’, श्रीराम हाउस, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पु), मुंबई या बार हॉलमध्ये गायीकांच्या नावाखाली महिलांकडुन विनापरवाना नृत्य करवून घेत असुन त्यांच्यावर भारतीय चलनी नोटा उधळल्या जात आहे व तसे करण्यास सदर बारचे मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, कर्मचारी, ऑर्केस्ट्रा कलाकार, गि-हाईक हे महिलांना प्रोत्साहन देत आहे.गुन्हे शाखा, अंमलबजावणी कक्षास त्यांच्या खास बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, अशा आशयाची माहिती प्राप्त झाल्यानुसार त्याबाबत शहानिशा तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची नियुक्ती करून नियोजनबध्द छापा Dance Bar Raid कारवाईची योजना आखून 4 मार्च 2024 रोजी अंमलबजावणी, गुन्हे शाखा येथील पोलीस पथकाने अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई च्या हददतील ‘श्रीरामभवन रेस्टॉरन्ट ॲन्ड बार, श्रीराम हाउस, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई येथे बोगस गि-हाईक पाठविले आणि दोन पंचासह 23.48 वा. छापा टाकला असता, तेथे बारचे 1) गिरीश हुआप्पा गौडा वय ४३वर्षे धंदा-मॅनेजर, 2) प्रमोद कुमार जनार्दन शेट्टी (44 वर्षे) धंदा-कॅशियर, 3) अजमल सरवर अली (33 वर्षे) धंदा-लॅपटॉप हाताळणारा, 4) सोनू प्रकाश नारायण दुबे (26 वर्षे) धंदा-स्टिवर्ड, 5) केशव कमलाक्ष शेट्टी वय (54 वर्षे) धंदा-स्टिवर्ड, 6) अरविंद जाडो सिंग (40 वर्षे) धंदा-वेटर, 7) विनोद सुदर्शन यादव (38 वर्षे) धंदा-वेटर यांनी आस्थापनेच्या हॉलमध्ये विनापरवाना आस्थापनेतील महिलांकडून नृत्य करवुन घेतले तसेच शासनाने दिलेल्या परवान्यातील अव ब मध्ये दिलेल्या बाबीनुसार अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. Mumbai Crime News

त्याचप्रमाणे आस्थापेनतील गि-हाईक इसम हे महिला करीत असलेल्या नृत्यास प्रोत्साहन करीत असताना मिळून आले. त्यामुळे सदर ठिकाणी दिसत्या परिस्थितीचा पंचनामा करुन मिळून आलेल्या 05 महिलांना सुरक्षिततेकामी महिला पोलीस कर्मचारी मार्फत ताब्यात घेवून आरोपीच्या विरोधात अंधेरी पोलीस ठाणे येथे 5 मार्च 2024 कलम 188, 34 भा. द. वि सह महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मदयपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणा-या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, 2016 च्या कलम 3, 8 (1) (2) (4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाईत रोख रक्कम रु 27 हजार 400 1 लॅपटॉप (अंदाजे किंमत 20 हजार), 1ॲम्प्लीफायर (अंदाजे किंमत 25 हजार), 1 स्पीकर (अंदाजे किंमत पाच हजार), अंदाजे किं. 500 रू चे शुटींगचे मेमरी कार्ड, असा एकूण अं. किं. 77 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाई करीता अंधेरी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले. Mumbai Crime News

पोलीस पथक

विवेक फणसळकर पोलीस आयुक्त (CP Vivek Phansalkar), देवेन भारती विशेष पोलीस आयुक्त, लखमी गौतम पोलीस सह आयुक्त, (गुन्हे), शशी कुमार मीना अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), रागसुधा आर. पोलीस उप-आयुक्त (अंमलबजावणी), सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमलबजावणी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोतदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बाळासाहेब कानवडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कन्हेरकर, महिला पोलीस हवालदार हळर्णकर, पोलीस शिपाई पाटसुपे, पोलीस शिपाई यादव, महिला पोलीस हवालदार पाटील व गुन्हे शाखा येथील पोलीस हवालदार जाधव तसेच अंधेरी पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक गणेश जाधव, पोलीस हवालदार सुर्यवंशी, पोलीस शिपाई जाधव यांच्या सह यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे. Mumbai Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0