मुंबई
Trending

Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आव्हान

•एकमेकांमध्ये योग्य समन्वय साधून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी

मुंबई :- लोकसभेची निवडणूक Lok Sabha Election 2024 जसजशा जवळजवळ येत आहे तसतसे पक्षांमध्ये उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये धावपळ चालू झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून Maha Vikas Aghadi जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले आहे की 07 मार्चपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय, बैठका घेण्याचे सांगण्यात आले असून 10 मार्च पर्यंत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे सांगण्यात आले आहे.त्यासाठी त्यांनी एक पत्र दिले आहे.

महाविकास आघाडी कडून पत्र (Maha Vikas Aghadi )

लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना कोणत्याही क्षणी जाहिर होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक विजय निश्चित करण्यासाठी एकसंघपणे लढण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. आगामी काळात आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने तसेच खंबीरपणे मनाने सर्व आव्हानांना सामोरे जायचे आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमधील योग्य समन्वय हेच विजयाचे पहिले पाऊल आहे. याची नोंद घ्यावी.

याक्षणी आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ” महाविकास आघाडीचा विजय” हीच आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय तोच आपल्या पक्षाचा विजय ही बाब आपण सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा विजयरथच महाराष्ट्राला संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण करून देईल याबाबत आपल्या मनात शंका नसावी.

निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संपूर्ण ताकदीने व मतभेद विसरून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रीत जिल्हानिहाय संयुक्त बैठक तातडीने घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण त्वरित एकमेकांमध्ये योग्य समन्वय साधून 7 मार्च, 2024 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक व 10 मार्च पर्यंत, 2024 पर्यंत लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावयाची आहे. तरी नियोजित कालावधी लक्षात घेता बैठका घेऊन यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपापल्या पक्षप्रमुखांकडे द्यावा, ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0