Waqf Board Grant Cancelled : वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या आदेशाची चर्चा होऊ लागली. त्यानंतर आता हा आदेशच मागे घेण्यात आला आहे.
मुंबई :- राज्य वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी 10 कोटी रुपये देण्याचे आदेश सरकारने मागे घेतले. Waqf Board Grant Cancelled मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ही माहिती दिली. याबाबत महाराष्ट्र भाजपने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र भाजपने सोशल मीडियावर पोस्ट
वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला GR रद्द
भाजपा-महायुती सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता. मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे.वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शासन निर्णय मागे घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 28 नोव्हेंबरच्या शासन आदेशानुसार, महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी 2024-25 या कालावधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी दोन कोटी रुपये छत्रपती संभाजी नगर येथील वक्फ बोर्डाच्या मुख्यालयाला देण्यात आले.
वक्फ बोर्डाला पैसे देण्याचे आदेश निघाल्यावर शिवसेना-ठाकरे टोमणा मारला होता. यावरून त्यांचा ढोंगीपणा दिसून येतो, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. टीकेदरम्यान, भाजपने स्पष्ट केले की हे प्रशासकीय त्रुटीमुळे घडले कारण सध्या राज्यात काळजीवाहू सरकार आहे जे असा कोणताही आदेश देऊ शकत नाही.