Pune Crime News : एम.डी.अंमली पदार्थ आणि देशी पिस्टल दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक
Pune Police Arrested Man With 14 Lakh worth Rs MD : 14 लाख 60 हजारांचे एम.डी (मेफेड्रॉन)अंमली पदार्थ केले हस्तगत, देशी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे आरोपींकडे सापडली
पुणे :- एमडी हा अंमली पदार्थ आणि देशी बनावटीचे पिस्टल, Deshi Pistol Caught In Pune दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन आरोपींना अमली पदार्थ विरोधी पथक-2 आणि खंडणी विरोधी पथक-2 गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 14 लाख 60 हजार रुपये किंमतीचा एम.डी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ आणि 67 हजार रुपयांचे देशी बनावटीची पिस्टल, मॅगजीन आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 16 लाख 57 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी फरासखान पोलीस ठाण्यात Faraskhan Police Station एनडीपीएस कायदा अंतर्गत कलम 8 (क),21(क),29 भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम 37 (1),(3) सह कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Police Latest News
पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना डायमंड बिल्डिंगच्या खाली मारुती मंदिर जवळ शुक्रवार पेठ येथे सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती यांच्याकडे अंमली पदार्थ आणि बंदूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले असता आणि त्यांचे अंग जडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडून 14 लाख 60 हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ आणि 67 हजार किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध फरासखान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपींची नावे बॉबी भागवत सुरवसे (28 वय रा. लक्ष्मी नगर येरवडा पुणे), तोसिफ ऊफ लड्डू रहीम खान (32 वय रा.1282 दुर्गा रोड, कसबा पेठ पुणे) असे आहे.आरोपींना अटक करून गुण्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक-2, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहे. Pune Police Latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त,अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-2 राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, सुरेंद्र जगदाळे, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अझिम शेख, अमोल राऊत, पवन भोसले, निलम पाटील, यांनी केली. Pune Police Latest News