सांगली-मिरज

Vishal Patil : सांगलीत विशाल पाटील यांना धक्का..!! स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला उमेदवार

•विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत, शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी

सांगली :- लोकसभा मतदारसंघाचा विषय यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेला जात आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने निवडणुकीची तयारी देखील केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेने खेचून आणण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारीची घोषणा झाल्यानंतरही जागावाटप जाहीर होईपर्यंत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे सांगलीतील काँग्रेसचे नेते या मतदारसंघाबाबत आशादायी होते. मात्र, महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसच्या आशा मावळली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हा मतदार संघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे नाराज आहेत. यातच विशाल पाटील हे अपक्ष निवडणुकीला सामोरे जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. विशाल पाटील यांनी 2019 मध्ये देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या वेळी देखील त्यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पर्याय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांना धक्का देत या मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील काळामध्ये ऊस दरवाढीच्या आंदोलनाच्या माध्यमातून जवळपास 500 किलोमीटर पदयात्रा काढली होती. या पदयात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्या पूर्ण पिंजून अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आले होते. त्यातच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी कणखर नेता म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळे ही लढाई ‘एक वोट, एक नोट’ या तत्त्वावर लढवली जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0