सांगली-मिरज

सांगली लोकसभेच्या जागे बाबत फेरविचार करावा ; काँग्रेस आमदार विश्वजीत कदम

Sangli Lok Sabha 2024 : शिवसेना सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना काँग्रेसकडून विरोध

सांगली :- सांगली लोकसभा Sangli Lok Sabha मतदारसंघाबाबत स्थानिक परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारी बाबत फेरविचार करावा, अशी मागणी सांगली काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केली आहे. सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने फेरविचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष भक्कम असून लढण्यास सक्षम आहे. त्यामुळे सांगली मधील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची ही भावना असल्याचे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. सांगलीच्या जागे बाबत महाविकास आघाडीने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

येणाऱ्या काळात आम्ही सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या भावना समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे. मात्र, असे असले तरी भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी लोकांची भावना समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले. त्यासाठी विशाल पाटील आणि मी मतदार संघाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Sangli Lok Sabha

आमदार विश्वजीत कदम नाराज

सांगली लोकसभा Sangli Lok Sabha मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयाला सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजीत कदम यांनी कडाडून विरोध केला होता. सांगली लोकसभा मतदारसंघ Sangli Lok Sabha हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीत उभा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार विशाल पाटील यांनी तयारी देखील केली होती. मात्र, तरी देखील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा ही उद्धव ठाकरे यांना सोडावी लागली. त्यामुळे विश्वजीत कदम हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच विशाल पाटील हे अपक्ष‌ उमेदवारीला सामोरे जातील, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. त्यामुळे विश्वजीत कदम काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0