Virar Police News : बांधकाम ठेकेदाराच्या हत्येचे रहस्य विरार गुन्हे शाखा कक्ष-3 उलगडले
Virar Crime News : रक्ताच्या थारोळ्यातील भावाचा मृतदेह आढळून आला होता
नालासोपारा :- दिपनारायण गोविंद बिंद याचा भाऊ प्रमोदकुमार गोविंद बिंद याचा संपर्क होत नसल्याने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार Nalasopra Police Station News दाखल केली होती. पोलिसांनी प्रमोदकुमार याच्या राहत्या घरी जाऊ खिडकीतून आत पाहिले असता प्रमोदकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोलीसांना आढळून आले होते. पोलिसांना भावांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात Pelhar Police Station भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, प्रमोदकुमार याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या खुनाचे रहस्य उलगडण्यात गुन्हे शाखे-3, विरार यांना यश आले आहे. Virar Crime News
रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. विरार पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्याचा शोध सुरू केला. शोध घेण्याकरिता तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे यातील आरोपी समीर कुमार उर्फ समरेश बच्चलाल बिंद (रा.जि. वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश.) लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पथकाने पोलिसांचे एक पथक मिर्जापुर वाराणसी येथे जाऊन आरोपी याला एसटीएफ वाराणसी पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. तसेच अटक आरोपीचे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने करत असताना प्रबोधकुमार उर्फ कतवारु गोविंद बिंद पुढील कारवाई करीता पेल्हार पोलीस ठाणे भारतीय न्याय संहीता 103 (1) या गुन्हयात हजर करण्यात आले आहे. Virar Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, ज्ञानेश्वर आव्हाड, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे. Virar Crime News