मुंबईक्राईम न्यूज

Virar Crime News : विरार पोलिसांनी जुगाराचा अड्डा उलथाडून लावला, 17 आरोपींना अटक, रेल्वे परिसरात खुलेआम जुगार

Virar Crime News विरार पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांची कारवाई ; जुगार अड्ड्यावर छापा 17 जणांना अटक

विरार ‌:– रेल्वे स्थानक परिसरात जुगाराचा अड्डा उलथाडून लावल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकत 17 आरोपींना अटक केली आहे.“Police Crackdown on Illegal Gambling Den at Virar Railway Station, 17 Charged” विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पैसे वापर करून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विरार पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत हा अड्डा उलथाडून लावला असल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांची कारवाई, जुगार अड्डाच्या मालकासह 17 जणांवर कारवाई

विरार रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या विरार गावठाण आणि विरार बस डेपो समोर एचडीएफसी बँक च्या पाठीमागे मोठा जुगार अड्डा चालत असल्याची गोपनीय माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन पंच साक्ष घेऊन जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. या छापा मध्ये पोलिसांनी एकूण 17 जणांवर कारवाई करत ताब्यात घेतले आहे. यामध्ये आठ जण तेथे कामाला असून आठ जाऊन जुगार खेळण्यासाठी आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच जागेचा मालक असलेला विक्रम काशिनाथ मांगेला (32 वर्ष) यालाही पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी यांच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमन 4,5 सह भादवि कलम 188,34 कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे परिसरात हा जुगार अड्डा चालल्याने स्थानिकांना येथे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या कानावर येत होत्या. पोलिसांनी या जुगार अड्ड्यांवर छापा टाकत उध्वस्त केल्याने स्थानिकांना आता न्याय मिळाल्यासारखे झाले आहे.

“Police crackdown on illegal gambling ring at Virar Railway Station leaves 17 in handcuffs”

पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार , पोलिसा हवालदार किणी, शेटये, शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, महिला पोलीस शिपाई पाटील, पोलीस हवालदार पागी, सर्व नेम.अन.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा विभाग तसेच विरार पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार लोखंडे, पोलीस शिपाई गावित, शेळके, सातपुते, शिंदे, पवार यांचेसह उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0