मुंबई

Mega Block : रविवारी पुन्हा एकदा रेल्वेचा मेगाब्लॉक..!! रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनो रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचा वेळापत्रक जाणून घ्या

Mega Block :  मुंबईचा मध्य हार्बर आणि पश्चिम तिन्ही रेल्वे मार्गावर दुरुस्ती देखभाल साठी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई :- मुंबईमध्ये लोकलने प्रवास Mumbai Local Train करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मुंबईमध्ये रविवार, 09 जून, 2024 रोजी मेगा ब्लॉक Mega Block घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर परिणाम होणार आहे. चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर 10:35 ते 15:35 या वेळेत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. Mumbai Train Has Been Mega Block On 9 June

मध्य रेल्वे (Central Railway Mega Block Updates)

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. (Central Railway Mega Block Updates)

सीएसएमटी येथून सकाळी 11.04 ते दुपारी 2.46 पर्यंत डाऊन धीमी सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर लोकल वळविण्यात येईल. घाटकोपर येथून सकाळी 11.14 ते दुपारी 2.48 पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबेल. (Central Railway Mega Block Updates)

हार्बर मार्ग (Harbor Railway Mega Block Updates)

सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल येथून सीएसएमटी / वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत बंद राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. (Harbor Railway Mega Block Updates)

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. (Harbor Railway Mega Block Updates)

Web Title : Mega Block : Railway mega block again on Sunday..!! Mumbaikars who travel by train, know the train schedule before traveling by train

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0