मुंबई

Manisha Kayande : आम्ही सोडून दिले’, भाजपच्या मुख्यमंत्रीच्या मागणीवर काय म्हणाल्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे?

मुंबई :- नवीन महायुती सरकार स्थापनेची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांची चर्चा जोरात सुरू आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या मागण्या मांडत आहेत.एकनाथ शिंदे यांनीही महायुतीकडे 12 मंत्रिमंडळ पदांची मागणी केली असल्याची माहिती सध्या मिळाली आहे. त्यावर आता शिंदे गटनेत्या मनीषा कायंदे Manisha Kayande यांचे वक्तव्य आले आहे.शिवसेनेला महायुतीत कोणती जबाबदारी हवी आहे, असे विचारले असता, मनीषा कायंदे म्हणाल्या, “माध्यमातून आलेल्या वृत्तांतून या सर्व बाबी समोर आल्या आहेत. याबाबत काय चर्चा सुरू आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी नुकतेच सांगितले. सरकार स्थापन करण्याकरिता मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही आणि मला अडथळा बनायचाही नाही.”

मनीषा कायंदे पुढे म्हणाल्या, “एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.कारण एकनाथ शिंदे हे एनडीएचे महत्त्वाचे अंग असून महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांनी त्यांची नेतेपदी निवड केली आहे. पक्षाच्या वतीने कोणाला बोलायचे आहे किंवा किती पदे मागायची आहेत, ते आम्ही त्यांच्यावर सोडले आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
05:54