देश-विदेश

viksit bharat sampark : ‘विकसित भारत’ असे व्हॉट्सॲप मेसेज पाठवण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली, ते तात्काळ थांबवा

viksit bharat sampark whatsapp messages : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्यामुळे देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

ANI :- लोकसभा निवडणुकीच्या 2024 संदर्भात निवडणूक आयोग कारवाई करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकास भारतच्या नावाने पाठवले जाणारे व्हॉट्सॲप मेसेज मोदी सरकारचा प्रचार करत होते. आता निवडणूक आयोगाने या संदेशावर बंदी घातली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला निर्देश देताना सांगितले की, आचारसंहिता लागू झाल्यानंतरही जर लोकांना विकसित भारताशी संबंधित संदेश येत असतील तर ते त्वरित थांबवावेत. याबाबत निवडणूक आयोगाने काय कारवाई केली, याचीही माहिती द्यावी. viksit bharat sampark whatsapp messages

यापूर्वी निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी येत होत्या की, लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतरही नागरिकांच्या फोनवर असे संदेश पाठवले जात आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काय म्हटले?

आयोगाकडून सूचना मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे संदेश पाठवण्यात आले होते. तथापि, त्यातील काही संदेश प्रणाली आणि नेटवर्क समस्यांमुळे लोकांपर्यंत उशिरा पोहोचले. त्याचवेळी आयोगाने मंत्रालयाला या प्रकरणी तातडीने अनुपालन अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0