मुंबई
Vedant Pote First In SSC Board : दहावीच्या परीक्षेत वेदांत पोटे उरण तालुक्यात प्रथम.
पनवेल : कोप्रोली येथील रहाणारा वेदांत प्रशांत पोटे हा सेंट मेरी जे एन पी शाळेत शिकत असून त्याने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून उरण तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे कुठलीही खाजगी शिकवणी न लावता या विद्यार्थ्याने हे यश मिळवले. कोप्रोली सारख्या खेडे गावात राहून सुद्धा या विद्यार्थ्याने संपूर्ण उरण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे त्याच्यावर सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.